परळी तालुक्यात खळबळजनक घटना:एका युवकाची कोयत्याने हत्या




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....  

       परळी तालुक्यातील जळगव्हाणच्या रत्ननगर तांडा येथील रहिवासी भीमराव शिवाजी राठोड (वय अंदाजे २६) या तरुणाची कौटुंबिक वादातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण याने भीमरावच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची प्राथमिक  माहिती समोर  आली.या घटनेने पुन्हा एकदा परळी तालुक्यात खळबळ माजली आहे.

      या घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.यांच्यात घरगुती वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. यातूनच ही हत्या झाली.अनिलने भीमरावला रत्ननगर तांडा, जळगव्हाण येथे बोलावले. त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली, जोरदार बाचाबाची झाली,  हाणामारी सुरु झाली यावेळी अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भीमरावचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध  पोलिस घेत आहेत. सिरसाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !