प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांचे कीर्तन
कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) यांच्या प्रथम वर्षश्राध्दानिमित्त कीर्तनाचे आयोजन
प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांचे कीर्तन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) यांच्या प्रथम वर्षश्राध्दानिमित्त रविवारी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांची कीर्तनसेवा होणार आहे.
परळी वैजनाथ येथील सराफा मार्केट मधील सर्व परिचित सुवर्णकार व्यावसायिक रमेश मुंडीक धारासुरकर यांचे वडील कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला असुन प्रेमभक्ती साधना केंद्राच्या माध्यमातून सातत्याने विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रमेश मुंडीक धारासुरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर, परळी वैजनाथ येथे रविवार, दि.२४/०८/२०२५ रोजी प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ श्री.ह.भ.प. बाळु महाराज जोशी उखळीकर यांचे किर्तन दु. ११ ते १ होईल.या किर्तनास व भोजनास उपस्थित रहावे असे आवाहन ॲड. सुरेश गंगाधरराव मुंडीक, रमेश गंगाधरराव मुंडीक व समस्त मुंडीक परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा