इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

मुंबई-गैरसोयीमुळं मराठा आंदोलक आक्रमक!

मनोज जरांगेंची पहिली मागणी पूर्ण; मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ



मुंबई :मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक या परिसरात दाखल झाले आहेत. या आंदोलनाची तीव्रता बघता राज्य सरकारनं जरांगेंची पहिली मागणी पूर्ण केली असून, मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचं जात प्रमाणपत्र, तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, तिची मुदत संपल्यानं, मुदतवाढ देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ती मागणी सरकारनं मान्य केली असून, समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.


वंशावळ समितीचा उद्देश काय?


- सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं 25 जानेवारी 2024 रोजी तालुकास्तरावर वंशावळ समिती गठीत केली होती. या समितीचा मुख्य उद्देश मराठा समाजातील पात्र व्यक्तींची वंशावळ तपासून त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देणं हा आहे. यामुळं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळवता येतील.

- यापूर्वी या समितीच्या कार्यकाळाला 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तसंच, न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आला होता. या उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीला अनुसरून तालुकास्तरीय समितीला किमान सहा महिन्यांची अधिक मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ 30 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

..........

गैरसोयीमुळं मराठा  आंदोलक आक्रमक

- मराठा आंदोलनाच्या पार्श्वूभीवर मंत्रालय परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, पायी जाणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करूनच त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिननसबाहेर आंदोलकांनी रस्ता अडवल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत असले, तरी आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत.

- मुंबईबाहेरून आलेले मराठा आंदोलक आझाद मैदानाकडे येत असल्याने सीएसएमटी रेल्वे स्टेशन परिसरात मोठी गर्दी झाली आहे. अनेक आंदोलकांनी रात्री सीएसएमटी आणि चर्चगेट रेल्वे स्टेशनांमध्ये आश्रय घेतला होता.

- आंदोलनासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्या जेवणाची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. काही मराठा बांधव आणि सामाजिक संस्थांनी आंदोलकांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. सरकारने कोणतीही सोय न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

- सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आझाद मैदानात सर्वत्र चिखल झाला आहे. यामुळे आंदोलकांना मोठी गैरसोय होत आहे. तरीही मराठा आंदोलक दृढनिश्चयाने तिथंच ठाण मांडून आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या