बीड जिल्ह्यात मोठी उपलब्धी.....

ना.पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश – बीड जिल्ह्यातील दोन मोठ्या कामांना मंत्रिमंडळाची मंजुरी



सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचा होणार विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतर ; आष्टीत नवीन दिवाणी न्यायालय स्थापनेचाही मार्ग मोकळा

मुंबई ।दिनांक २६। 

बीड जिल्ह्यासाठी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असुन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा व विधी विभागांतर्गत बीडसाठी दोन मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतर होणार आहे.तर आष्टी येथे नवीन दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार आहे.


     सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतर याबाबतच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता देत, बीड जिल्ह्यातील शिरूर (कासार) तालुक्यातील निमगाव व ब्रम्हनाथ येळंब आणि गेवराई तालुक्यातील टाकळगाव (हिंगणी) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार करण्यास तसेच त्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाणीसाठवण क्षमता वाढून शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून, स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच 

आष्टी येथे नवीन दिवाणी न्यायालयाची स्थापना याबाबत विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचे नवीन न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती तसेच त्यासंबंधित खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आष्टी व परिसरातील नागरिकांना न्यायासाठी जिल्हा मुख्यालयावर जाण्याची गरज भासणार नाही. ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रीमंडळात हे दोन मोठे निर्णय झाल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !