दुर्देवी घटना.....!
खतपेरणीसाठी शेतात असणाऱ्या एकाचा वीज पडून मृत्यू
परळी वैजनाथ दि.०७ (प्रतिनिधी)
शहरातील वैद्यनाथ मंदिर परीसरातील रहिवाशी कोंडिबा जयवंत कवले (वय ४८) यांचा नागापूर येथील शेतात विज पडून मृत्यू झाला तर पत्नी किरण जखमी झाल्या आहेत.
शहरातील वैद्यनाथ मंदिर परीसरातील रहिवाशी कोंडिबा जयवंत कवले यांचे तालुक्यातील नागापूर येथे शेती आहे. शेतात पत्नी किरण सह खत पेरणीसाठी गेले असता सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक विजेचा गडगडाट व पावसाला सुरूवात झाली. यामुळे कोंडिबा व किरण शेतातील लिंबाच्या झाडाखाली उभे राहिले असता विज पडली यामध्ये कोंडिबा कवले यांचा जाग्यावर मृत्यू झाला व पत्नी किरण जखमी झाल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ बैलगाडी मध्ये गावात आणून तिथून दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यावर शुक्रवारी (ता.०८) दुपारी बारा वाजता विरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा