वैद्यनाथ बँक निवडणुक ; ना. पंकजा मुंडेंचा परळीत मतदार, कार्यकर्त्यांशी संवाद
लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयाचा केला संकल्प
परळी वैजनाथ ।दिनांक ०३।
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेच्या निवडणुक प्रचारार्थ सभासद मतदार व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयाचा संकल्प यावेळी करण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष विनोद सामत यांच्या निवासस्थानी ना. पंकजाताई मुंडे यांनी सभासद मतदारांना संबोधित केले. चेअरमन विनोद सामत यांच्यासह व्हा. चेअरमन रमेश कराड, विकासराव डुबे, शांतीलाल जैन, जुगलकिशोर लोहिया, सूर्यभान मुंडे, सतीश मुंडे, वैजनाथ जगतकर, बाजीराव धर्माधिकारी, वैजनाथ सोळंके, माऊली फड आदी यावेळी उपस्थित होते.
वैद्यनाथ बँकेविषयी आपल्या सर्वाच्याच मनात एक वेगळी भावना आहे, एक वेगळा आदर आहे. लोकनेते मुंडे साहेब यांनी बँकेच्या प्रगतीकडे सातत्याने लक्ष दिले. या भागाची आर्थिक उन्नती केली. परळीच्या प्रगतीत बँकेचा सिंहाचा वाटा आहे. बँकेला याहून अधिक यशोशिखरावर घेऊन जाण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी मेहनत घ्या असं आवाहन ना. पंकजाताईंनी केलं.
चार उमेदवार बिनविरोध; १३ जागेसाठी १० तारखेला मतदान
वैद्यनाथ बँकेच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे चार उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत, यात माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, माधुरी मेनकुदळे, अनिल तांदळे व प्रा. विनोद जगतकर यांचा समावेश आहे. उर्वरित १३ जागांवर सर्वश्री विनोद सामत, रमेश कराड, प्रकाश जोशी, संदीप लाहोटी, डाॅ राजाराम मुंडे, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाकेकर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री हे निवडणुक लढवत आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा