शहरातील उघड्या गटारी, खड्ड्यामुळे अपघात, नगरपरिषदेने त्वरित खड्डे बुजवून घ्यावेत- अश्विन मोगरकर





परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

मोंढा मार्केट येथे उघड्या व्हॉल्व्ह च्या खड्ड्यात चारचाकी गाडीचे चाक फसल्याने परळी नगरपरिषदेचा भोंगळ कारभार उघडा पडला आहे. गणेशपार येथील नालीही मागील दीड महिन्यांपासून खोदून ठेवल्याने अपघाताची शक्यता आहे. परळी नगरपरिषदेकडून आवश्यक कामाकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप भाजपा सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी केला आहे. 

परळी शहरात कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी आला आहे. रस्ते, नाली, भूमिगत गटार अश्या विविध विकास कामामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याऐवजी नगरपरिषदेच्या आंधळ्या कारभाराचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. शनिवार, दि 16 ऑगस्ट रोजी सकाळी मोंढा मार्केट मधील टेलर लाईन जवळ उघड्या स्थितीत असलेल्या व्हॉल्व्ह च्या खड्ड्यात चारचाकी वाहनाचे पुढील चाक गेल्याने अपघात झाला. यात गाडीचे नुकसान झाले मात्र सुदैवाने चालकाला कुठलीही दुखापत झाली नाही. यापूर्वीही अनेक नागरिक व  वाहने या उघड्या खड्ड्यात पडली आहेत. नगरपरिषदेकडे या भागातील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा सांगूनही हा खड्डा बंद केला नाही. 

गणेशपार येथील मुख्य चौकातील नाली दीड महिन्यांपूर्वी खोदून ठेवलेली आहे. याबाबतीत नगरपरिषद प्रशासनाकडे अश्विन मोगरकर यांनी तक्रार केल्यानंतर नप अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली व दोन तीन दिवसात नालीचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही काम केले गेले नाही. मुख्य चौकातील वळणावरच नाली खोदून ठेवल्याने अनेक वेळा वृद्ध नागरिक, लहान मुले यात पडली आहेत. वारंवार सांगूनही या नालीचे बांधकाम केले गेले नाही.

शहरात अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, उघड्या नाल्या बुजवायचे सोडून बंद अवस्थेत असलेल्या अंबेवेस येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर पेव्हर ब्लॉक बसवले जात आहेत. नागरिकांनी कररूपी दिलेल्या पैशातून सुविधा देण्याचे काम नगरपरिषदेचे आहे. मात्र अनवश्यक कामे करून आवश्यक कामाकडे कानाडोळा करून आंधळा कारभार केला जात असल्याचा आरोप भाजपा सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !