अरोही स्टाईल स्टुडीओमुळे असंख्य महिलांचे करिअर घडले-उमाताई समशेट्टे

नविन जागेतील स्थलांतर महिलांसाठी सोयीचे-सरोजनीताई हालगे 

परळी (प्रतिनिधी)

 महिलांनी आपला व्यवसाय सुरु करुन स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी ब्युटी पार्लर व इतर कलांमध्ये निपुन असलेल्या जुन्या परळी भागातील श्रध्दा हालगे(फुलारी) या युवतीने सुरु केलेल्या अरोही स्टाईल स्टुडीओमुळे मागील काही वर्षात असंख्य महिलांनी स्वतःचे व्यवसाय उभे करत करिअर घडवले असल्याचे भाजपा शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी सांगितले तर अरोही स्टाईल स्टुडीओ आता नविन रुपात परळीच्या मुख्य रस्त्यावर सुरु झाल्याने महिलांची सोय झाल्याचे माजी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे यांनी सांगितले.अरोही स्टाईल स्टुडीओ उर्जा कॉम्प्लेक्स, मिलिंद शाळेजवळ, राणी लक्ष्मीबाई टॉवर रोड येथे स्थलांतरित झाल्यानंतर आयोजित पानसुपारी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 अत्यंत माफक दरात मेकअप व इतर सुविधांच्या उपलब्धतेमुळे परळी शहर व परिसरातील महिला व युवतींच्या पसंतीस उतलेल्या श्रध्दा हालगे (फुलारी) यांच्या अरोही स्टाईल स्टुडीओचे उर्जा कॉम्प्लेक्स येथे स्थलांतर झाले आहे.अधिक विस्तृत जागेत,अत्याधुनिक साधनांसह नव्या रुपात सुरु झालेल्या या स्टडीओ स्थलांतरानिमीत्त रविवार दि.३ ऑगस्ट रोजी भाजपा शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे,माजी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे,माजी नगरसेविका श्रीमती गंगाताई शिंदे,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रद्धाताई हालगे पुणे येथील मेकअप आर्टिस्ट मिना शैलेश जाधव,भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुचिताताई पोखरकर,रेणुकाताई वैजनाथ सोळंके,भाजपा शहर उपाध्यक्षा वर्षाताई जोशी,समिक्षा श्रीकांत पाथरकर धारुर येथील मेकअप आर्टिस्ट निलम रवी वावधनी यांच्या उपस्थितीत पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख अतिथींचे स्वागत अरोही स्टाईल स्टुडीओच्या संचालिका श्रध्दा हालगे (फुलारी) यांनी  केले. 

सहकार्यासाठी सदैव तयार-श्रध्दा हालगे-फुलारी

    मी ब्युटी पार्लर व्यवसायात पाऊल ठेवल्यानंतर व्यवसायापेक्षा मैत्री व महिला,युवतींनी आपापले व्यवसाय सुरु करावेत यासाठी सहकार्य करण्यावर भर दिला असुन आज जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून आम्ही पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.यासाठी मला माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह मैत्रिणींचे पाठबळ मिळत आहे.भविष्यातही सर्वांना सोबत घेवुन अरोही स्टाईल स्टुडीओच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे श्रध्दा हालगे (फुलारी) यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !