इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

कौतुकाची पाठीवर थाप....!

NEET 2025 मध्ये यशस्वी झालेल्या कु. मधुरा तिळकरीचा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारा कडून गौरव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :परळी शहरातील कु. मधुरा संदीप तिळकरी हिने NEET 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या परिवारासह शहराचेही नाव उज्ज्वल केले आहे. तिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे एम.बी.बी.एस. या कोर्ससाठी प्रवेश निश्चित झाला आहे. या यशाचा आनंद व्यक्त करत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, परळी वै यांच्या वतीने तिचा उत्साहवर्धक सत्कार करण्यात आला.

सत्कार कार्यक्रमाला महादेव इटके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. सुदाम कापसे,  शिरीष चौधरी, सौ. रेणुका चौधरी, कु. मधुरा महादेव इटके,  संदीप तिळकरी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. संजयभैया सेवलकर यांनीही उपस्थित राहून कु. मधुरा हिच्या मेहनतीचे व जिद्दीचे मनापासून कौतुक केले.

     कु. मधुराच्या या यशामध्ये तिचे वडील आदर्श शिक्षक  संदीप तिळकरी यांचा विशेष मोलाचा वाटा आहे. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने योग्य मार्गदर्शन केले तसेच अभ्यासातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिक परिश्रम यांचे महत्व समजावून सांगितले. यासोबतच काका  दीपक तिळकरी, काकू सौ. वर्षा दीपक तिळकरी आणि भाऊ चि. सोहम यांनीही अखंड पाठबळ दिले. त्यांच्या प्रेरणेने आणि सहकार्यानेच मधुराने हे स्वप्न साकार केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने कु. मधुरा हिला उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पालक, नातेवाईक व शिक्षकांनीही तिच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या