आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयश.....

 वैष्णवी गित्तेचा आंतरराष्ट्रीय संशोधनात यशस्वी सहभाग: संशोधन पेपर प्रकाशित




परळी वैजनाथ, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर येथील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (JNEM) अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी वैष्णवी शिवाजी गीते हिने आपल्या संशोधन प्रवासात मोठे यश मिळवले आहे. वैष्णवी ही परळी तालुक्यातील नंदागौळ येथील सुकन्या आहे. “Behavior of Zener Diode for AC Input and Applications” या विषयावर केलेले तिचे संशोधन 1st International Conference on Sensors and Microsystems (ICSM-2024) या आंतरराष्ट्रीय परिषदेतील निवडक पेपर्समध्ये स्थान मिळवून, Springer Nature Link या प्रतिष्ठित प्रकाशनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर प्रकाशित झाले आहे.


परळी तालुक्यातील नंदागौळ येथील सुकन्या वैष्णवीने तिचा संशोधन प्रवास दुसऱ्या वर्षात सुरू केला. सुरुवातीला तिला समस्या विधान समजून घेण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागला, परंतु तिने चिकाटीने अभ्यास सुरू ठेवत, सलग दोन वर्षे प्रयोग, वाचन आणि विश्लेषण यामध्ये घालवले.

तिच्या प्रकल्पात झेनर डायोड व LDR चा वापर करून DC मोटरचे वेग व दिशा नियंत्रण करण्याची एक अभिनव व खर्चिकदृष्ट्या कार्यक्षम पद्धत मांडण्यात आली आहे. या प्रणालीचा उपयोग स्मार्ट फॅन, सोलर ट्रॅकिंग, औद्योगिक ऑटोमेशन, व प्रकाश-आधारित मोटर नियंत्रण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये होऊ शकतो.


या यशाबद्दल बोलताना वैष्णवी म्हणाली, “संशोधन म्हणजे एक सतत चालणारा प्रवास आहे. त्यात धैर्य, सातत्य आणि शिकण्याची तयारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सुरुवातीला अडचणी आल्याच, पण त्या हळूहळू सोडवता आल्या. आज माझा पेपर जागतिक स्तरावर प्रकाशित झाल्याचा मला अभिमान वाटतो.”

    वैष्णवीच्या या यशामुळे परळीत तिचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !