परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अखेर शोध सुरु असलेल्या युवकाचा सापडला मृतदेह.....!

बचावकार्यात सकाळी तिघांना वाचवले:पुरात वाहून गेलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला




परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...

       परळी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने कवडगाव हुडा येथील लिंगी नदीला आलेल्या पुरात चार चाकी मधून प्रवास करणारे चार युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आल्यानंतर तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते मात्र एक जण बेपत्ता होता सकाळपासून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते अखेर आज दुपारी एक पंधरा वाजण्याच्या सुमारास या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे

           कौडगाव हुडा (ता. परळी वै.) येथे पूरात अडकलेल्या चार जणांपैकी तिघांना सुखरूप वाचवण्यात यश आले मात्र एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कौडगाव हुडा परिसरात आलेल्या पूराच्या पाण्यात काल मध्यरात्रीपासून चार युवक अडकले होते. यामध्ये तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाला यश आले असुन एका युवकाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे.1. अमर मधुकर पोळ (वय 22, रा. डिग्रस) 2. राहुल संपत्ती पोळ (वय 32, रा. डिग्रस) 3. राहुल सटवजी नवले (वय 22, रा. फुलरवाडी, ता. पाथरी) अशी सुखरूप वाचवलेल्या युवकांची नावे आहेत. घटनेनंतर चौघांनाही तातडीने शोधण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. त्यात तीन युवकांना सुखरूप वाचवण्यात यश आले. मात्र, विशाल बल्लाळ यांचा शोध सुरु होता. अनेक तासांच्या शोधकार्यानंतर त्याचा  मृतदेह पाण्यातून सापडला आहे.विशाल बल्लाळ (वय 24, रा. पुणे) असे दुर्दैवी मृत्यू  झालेल्या युवकाचे नाव आहे. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालय, सिरसाळा येथे पाठवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्याजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!