परळीत ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई !

तांबे,पितळ, अॅल्युमिनिअम/जर्मन अशा धातूंची चोरी : टेम्पोभर माल पकडला  



परळी ते बीड रोडवर सुमारे 16.5 लाखांचा मुद्देमाल जप्त

परळी वैजनाथ,प्रतिनिधी....

      परळी ते बीड रोडवरील पांगरी कॅम्प चौक परिसरात सुमारे 16 लाख 54 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल परळी वैजनाथ ग्रामीण पोलिसांनी जप्त करत एक गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी शब्बीर अकबर काकर (रा. काकर मोहल्ला, परळी वै.) याच्याविरुद्ध कलम 303(2), 317(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      ही घटना 3 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9.30 ते 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली. मात्र जप्त करण्यात आलेले धातू व त्यांचे परिक्षण,मोजदाद आदी सविस्तर प्रक्रिया पुर्ण  केल्यानंतर फिर्यादी विशाल विजयकुमार वडमारे (वय 35, पोलीस कर्मचारी, परळी ग्रामीण पो.स्टे) यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत अॅल्युमिनिअम/जर्मन इलेक्ट्रीक तार,तांब्याची तार,पितळ प्लेट्स आणि आयशर टेम्पो  असा 16,54,600 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

 गुन्हा कसा उघडकीस आला?         आरोपीच्या ताब्यातून मिळालेला वरील सर्व मुद्देमाल कोठून आणि कसा खरेदी केला हे विचारल्यावर आरोपीने समाधानकारक उत्तर दिले नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या खरेदी पावत्या सादर केल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मुद्देमाल चोरीचा असल्याचा संशय बळावल्याने गुन्हा नोंदवून अप्रामाणिक खरेदी केल्याचा ठपका ठेवत परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे  पो.नि. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पो.उपनि. निमोणे हे करीत आहेत.

काय व किती मुद्देमाल जप्त?

      या कारवाईत टेम्पोभरुन मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन यामध्ये 140 किलो अॅल्युमिनिअम/जर्मन इलेक्ट्रीक तार, 70,000 रु. किंमतीची तांब्याची तार, 700 रु.प्रतिकिलो च्या 1042 किलो  पितळ प्लेट्स व 300 प्रति किलोच्या 184 किलो पितळ प्लेट्स असा धातूचा मुद्देमाल व आयशर टेम्पो जप्त करण्यात आला.या कारवाईत एकूण  16 लाख,54 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !