मी माझ्या वडिलांची सुधारित आवृत्ती

 'इक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी'

लातुरात ना. पंकजा मुंडे यांनी  जागवलेल्या लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणीने वातावरण भारावले !

लातूर ।दिनांक ११।

'इक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी' अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी जागवलेल्या लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणीने वातावरण भारावून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लातूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले.त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे चांगल्याच भावूक झाल्या. 

      मी त्यांच्यावर मी एक डॉक्युमेंट्री बनवली होती. त्यावेळी काय ओळी म्हणाव्या ते मला सुचत नव्हते. 'इक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी,' असे म्हणताच त्यांना हुंदका दाटून आला.

     पंकजा मुंडे म्हणाल्या, आज माझे वडील तथा आपल्या सर्वाचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची कर्मभूमी असलेल्या लातूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. कदाचित त्यांनीच या पुतळ्व्याचे उद्धाटन करावे, अशी गोपीनाथ मुंडेंचीच इच्छा असेल. आज काय बोलावे हे मला कळत नाही. ज्या दिवशी माझे वडील गेले त्यादिवशी आम्हाला जबर धक्का बसला होता, मी रुग्णालयात गेले तेव्हा दिल्लीत मला कुणीही ओळखीचे वाटत नव्हते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस गोपीनाथ मुंडेच्या मृतदेहाजवळ उभे होते, दिल्लीत तेव्हा मला कुणीच ओळखत नव्हते.यावेळी मी त्यांना हाक मारत टाहो फोडला होता, मला नितीन गडकरी यांनी फोन करून नेमके काय घडले हे सांगितले, मी रुग्णालयात जाईपर्यत ते थांबतील अशी माझी भाबडी अपेक्षा होती. पण काही कामानिमित्त त्यांना जावे लागले, मला माझ्या वडिलांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप दिवस लागले असे त्या म्हणाल्या.

मुंडे साहेबांनी जिवंतपणीच मला वारस घोषित केले

    पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, मुंडे साहेबांनी मला जिवंतपणी आपला वारस घोषित केले होते, हा वारसा संपत्ती, जमीन, पैसा यांच्या पलिकडला होता, माझे वडील माझे गुरू होते. त्यांनी मला काय करायचे हे कधीच शिकवले नाही 

पण काय करायचे नाही हे मात्र शिकवले. त्यांनी मला बेरजेचे राजकारण करण्याचा सल्ला दिला. तसेच स्वाभिमान गहाण न ठेवण्याचीही शिकवण दिली. ते म्हणायचे कुणी टाकलेले तुकडे उचलू नका. परिस्थितीपुढे कधीही झुकायचे नाही. राजकारणात काम करताना कुणाविषयीही द्वेष बाळगायचा नाही. नेहमी बेरजेचे राजकारण करायचे. तेच राजकारण आज फडणवीस तंतोतंत करत आहेत. म्हणून आज ते सत्तेत आहेत.


मी माझ्या वडिलांची सुधारित आवृत्ती

       पंकजा मुंडे यांनी यावेळी आपण आपल्या वडिलांची सुधारित आवृत्ती असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, अनेकजण माझी कार्यपद्धती मुंडेसाहेबांसारखी नसल्याचा आरोप करतात. ते खरे आहे. माझी कार्यपद्धती त्यांच्यासारखी नाही. पण त्यांना अपेक्षित अशीच आहे. तुला गोपीनाथ मुंडे व्हायचे आहे, पण सुधारित आवृत्ती वहायचे आहे असे मला मुंडे साहेबांनीच सांगितले होते. त्यामुळे मी कधीही स्वाभिमान गहाण न ठेवता राजकारण करण्याचे वचनत्यांना दिले, मी त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !