आंदोलनकर्त्यांचा आज दुसरा दिवस

 ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराविरोधात बेमुदत धरणे आंदोलन


परळी / प्रतिनिधी

वित्त आयोग व इतर शासनाच्या सर्व योजनेतून मोहा ग्रामपंचायत हद्दीत सण 2021-25 काळात शासनाचा किती निधी प्राप्त झाला व तो ठिकाणासह कोणत्या कामावर खर्च झाला? याचा पारदर्शक तपशील जनतेला देण्यात यावा यासह इतर मागण्या घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व गावकऱ्यांनी ग्राम पंचायतच्या अनागोंदी कारभाराविरोधात ग्राम पंचायत कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. 


बनावट बोगस लाभार्थी दाखवत गावातील ओबीसींच्या तीन घरकुलाचा निधी हडप करणाऱ्या सर्व दोषींना कठोर शासन करण्यात यावे, वित्त आयोग व शासनाकडून गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा विनियोग कुठे आणि कसा करण्यात आला याचा पारदर्शक तपशील गावकऱ्यांना देण्यात येऊन कोणते काम केले हे गावकऱ्यांना निदर्शनास आणून द्यावे. ग्राम पंचायती कडून सातत्याने ग्रामसभा टाळून पंचायत राज शासन प्रणालीला हरताळ पुसण्याचे काम सुरू ही कार्यपद्धती तात्काळ थांबविण्यात यावी.ग्रामपंचायत बैठका संदर्भात आदल्या दिवशी शॉर्ट निरोप देऊन दुसऱ्या दिवशी अचानक बैठक लावण्याचा व बैठकांमध्ये गोलमाल उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार सातत्याने घडत असून हा अनागोंदी कारभार तात्काळ बंद करण्यात यावा, ग्रामपंचायतच्या मासिक बैठकांमध्ये वारंवार या मागण्या संदर्भात प्रश्न उपस्थित करूनही कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याच्या नाराजीने नाईलाजाने

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मोहा शाखा व मोहा ग्रामस्थांच्या वतीने बुधवार दि. 12 पासून मोहा ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराविरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज दुसऱ्या दिवस आहे. या धरणे आंदोलनात ग्राम पंचायत सदस्य कॉ.प्रवीण देशमुख, कॉ.मदन वाघमारे, माजी सरपंच कॉ.सुदाम शिंदे यांच्यासह संदीप शहाजीराव देशमुख, विशाल शिवाजीराव देशमुख, बाळासाहेब शिवाजीराव देशमुख, विष्णू बाळासाहेब देशमुख, ब्रम्हांनंद देशमुख, रमेश महाजन, कुमार महाजन, दत्ता कांबळे, अण्णा शिंदे, वैजनाथ पाळवदे, विश्वाभर वाघमारे, ज्ञानोबा देशमुख, शिवाजी पांचाळ आदींसह अनेक गावकरी उपस्थित आहेत. या आंदोलनास सिरसाळा येथील पोलीस अधिकारी यांनी भेट देत कायदा व सुव्यवस्था याची पाहणी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !