प्लॉट घेण्यासाठी पाच लाख आण म्हणत विवाहितेस घराबाहेर काढले
परळी(प्रतिनिधी)
तु काम करत नाहीस,तुला काहीच येत नाही असे म्हणत तुझ्या वडिलांकडून प्लॉटसाठी पाच लाख रुपये घेवुन ये असे म्हणत मारहाण करुन घराबाहेर काढल्याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरकडील चौघांविरुद्ध संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील सावतामाळी रोड परिसरातील अंकिता हिचे दामपुरी ता.जि.परभणी येथील भरत बोबडे यांच्याशी विवाह झाला होता.लग्नानंतर काही महिन्यांतच तिला त्रास देणे सुरू झाले.तु काम करत नाहीस,तुला काहीच येत नाही असे म्हणत वडिलांकडून प्लॉटसाठी पाच लाख रुपये घेवुन ये असे म्हणत शारीरीक व मानसिक छळ करुन घराबाहेर काढले व पैसे आणेपर्यंत घरात घेणार नसल्याची धमकी दिली.याप्रकरणी विवाहिता अंकिता बोबडे हिच्या फिर्यादीवरून भारत बोबडे,शांताबाई बोबडे,कृष्णा जमरे,सोनाली जमरे या चौघांविरुद्ध संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा