लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयासाठी शहरात भव्य प्रचार फेरी

वैद्यनाथ बँकेच्या सुरक्षित भविष्य आणि वेगवान प्रगतीसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन



लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयासाठी शहरात भव्य प्रचार फेरी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 

       वैद्यनाथ को - ऑपरेटिव्ह बँकेच्या सुरक्षित भविष्य आणि वेगवान प्रगतीसाठी राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन भजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - शिवसेना (शिंदे) महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारासाठी शहरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मतदारांनी उत्स्फूर्तप्रतिसाद दिला.

      वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठी येत्या रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, सौ. माधुरी मेनकुदळे, अनिल तांदळे, प्रा. विनोद जगतकर हे चारजण बिनविरोध निवडून आले आहेत. तर 13 जागांवर विद्यमान अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेशराव कराड, विजयकुमार वाकेकर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, माहेश्वर निर्मळे, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री हे उमेदवार आहेत. आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारासाठी भजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - शिवसेना (शिंदे) महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात भव्य प्रचार फेरी काढली. या फेरीचा शुभारंभ गणेशपार येथील श्री गणेशाला श्रीफळ वाढवून करण्यात आला. यानंतर गणेशपार, उखळवेस, भिमनगर, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली, अंबेवेस, देशमुख गल्ली, देशमुख पार, नेहरू चौक आदी भागात जाऊन कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटी घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केले.

      या प्रचारफेरीत भाजपाचे जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, वैजनाथ जगतकर, श्रीराम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार), वैजनाथ सोळंके, बाजीराव धर्माधिकारी, सुरेश टाक, उमेदवार प्रकाश जोशी, अनिल तांदळे, प्रा. विनोद जगतकर, योगेश मेनकुदळे, यांच्यासह राजेंद्र ओझा, महादेव इटके, राजेंद्र सोनी, उमेश खाडे, अश्विन मोगरकर, अनिश अग्रवाल, बालासाहेब कराळे, वासुदेव पाठक, , सुशील हरंगुळे, शफिया इनामदार, अनिल आष्टेकर, सौ. चित्रा देशपांडे, सौ. चंदाताई ठोंबरे, श्रीमती बोडखे, दत्ताभाऊ सावंत, योगेश जाजू, मोहन जोशी, नितीन समशेट्टी, संतोष सामत, सय्यद सिराज, संजय देवकर, वैजनाथ रेकने, श्रीपाद शिंदे , लाला खान, जितेंद्र मस्के, भागवत गिते, गोविंद वाकेकर, विलास जुनाळ, रमेश मस्के, एजाजभाई, बालाजी घोडके, शेख खदीर, सचिन स्वामी, यश लाहोटी, अजय डुबे, जगदीश मंत्री, मुकेश पाटील आदींसह भजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - शिवसेना (शिंदे) महायुती आणि महायुती प्रचार समितीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !