तेली समाजाच्या वतीने वैद्यनाथ बॅकचे चेअरमन विनोद सामत विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल सत्कार
परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)
वैद्यनाथ बॅकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत बॅकेचे चेअरमन विनोद सामत व संपूर्ण संचालक मंडळ विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल येथील तेली समाजाच्या वतीने शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
येथील दि वैद्यनाथ को ऑपरेटिव्ह बॅकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मंगळवारी (ता.१२) झालेल्या मतमोजणी मध्ये मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन विनोद सामत व संपूर्ण संचालक मंडळ विक्रमी मतांनी विजयी झाले. याबदल तेली समाजाच्या वतीने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, कोलूघाणा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश लांडगे, श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवा लांडगे, शिवकुमार व्यवहारे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नांदेड विभाग उपाध्यक्ष प्रा प्रविण फुटके, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा सचिव प्रा मधुकर शिंदे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे तालुकाध्यक्ष मोहन राजमाने, शहराध्यक्ष अशोक बेंडे, कोषाध्यक्ष तुळशीराम सालमोटे, छगनआप्पा क्षीरसागर, शनैश्वर प्रतिष्ठानचे विश्वस्त मल्लिकार्जुन साखरे, अमोल फुटके आदि तेली समाजातील नागरिकांनी आंबेजोगाई रस्त्यावरील विनोद सामत यांच्या निवासस्थानी चेअरमन विनोद सामत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पेढे देवून सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा