हे प्राधिकरण निश्चितच विकासात्मक भूमिका बजावेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंकजा मुंडेंच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल: ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ ची स्थापना !



नद्यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात एक नवा अध्याय

माझ्यासाठी हे केवळ प्रशासकीय काम नाही तर संकल्प होता - पंकजाताई मुंडे

मुंबई, प्रतिनिधी....

       राज्यच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राने आज पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी  "महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण" (Maharashtra State River Rejuvenation Authority - MSRRA) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला पर्यावरण आणि हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, वातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे तसेच सल्लागार संस्थेच्या नमिता रेपे उपस्थित होत्या.पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या प्रकल्पावर सातत्याने काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली विभागाने एक सविस्तर आराखडा तयार करून तो आज मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर केला. सादरीकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावास तात्काळ मान्यता दिली आणि आता तो प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

          महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांवर प्रदूषणाचा मोठा विळखा आहे. या पार्श्वभूमीवर  प्राधिकरणाची स्थापना म्हणजे नद्यांसाठी एक नवा श्वास आणि राज्यासाठी हरित भविष्याकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नद्यांची स्थिती सुधारण्यास आणि प्रदूषण नियंत्रणाला निश्चितच गती मिळणार आहे.

काय आहे एमएसआरआरए (MSRRA) ?

-----------------------

    एमएसआरआरए  (MSRRA) म्हणजे एक स्वतंत्र प्राधिकरण जे राज्यातील नद्यांची स्वच्छता, पर्यावरणीय पुनरुज्जीवन, प्रदूषण नियंत्रण आणि नदी किनाऱ्यावरील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी कार्य करेल. हे प्राधिकरण विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यात समन्वय साधून एकात्मिक धोरणांची अंमलबजावणी करणार आहे.राज्यातील प्रमुख नद्यांची निवड करून त्या-त्या नदीसाठी स्वतंत्र पुनरुज्जीवन आराखडे तयार करणे, औद्योगिक व शहरी क्षेत्रांतील सांडपाण्यावर नियंत्रण ठेवणे,जनसहभाग, एनजीओ, व जलतज्ज्ञांचा समावेश करणे,निधीची तरतूद आणि योजनेची अंमलबजावणी सुरू करणे आदी चौफेर काम या प्राधिकरणाच्या माध्यमातून करता येणार आहे.राज्यातील नद्यांचे शाश्वत पुनरुज्जीवन साध्य करण्यासाठी हे प्राधिकरण व्यापक काम करणार आहे. दैनंदिन कामकाजासाठी एमपीसीबीचे सदस्य सचिव प्रमुख असलेले एक समर्पित सचिवालयही स्थापन करण्यात येणार आहे.

माझ्यासाठी हे केवळ प्रशासकीय काम नाही तर संकल्प होता - पंकजाताई मुंडे

-----------------------

       नद्यांचे पुनरुज्जीवन हे माझ्यासाठी केवळ एक प्रशासनिक काम नव्हते, तर एक संकल्प होता. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सतत अभ्यास, चर्चा आणि आराखडा तयार करण्याचे काम करत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या या उपक्रमाला त्वरित मान्यता दिली, याबद्दल त्यांचे शतशः आभार अशी भावना यानिमित्ताने पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.


प्राधिकरणाची अशी आहे रचना

------------------------------------

      प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार आहेत. यासोबतच पर्यावरण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती कार्यरत राहील. या राज्यस्तरीय समितीमध्ये तांत्रिक तज्ञ, वित्तीय व कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव तसेच आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांतील तज्ज्ञ सदस्य यांचा समावेश असेल.

        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !