संभाजीनगर परळी वैजनाथ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई

चोरीप्रकरणी एक अटकेत; सोन्याचा गोपसहित 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत



 संभाजीनगर परळी वैजनाथ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     परळी वैजनाथ  बसस्थानक येथे गळ्यातील सोन्याचा गोप चोरीला गेल्याच्या घटनेचा छडा लावत संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने एकास अटक करत 25 ग्रॅम वजनाचा, अंदाजे 2.5 लाख रुपये किमतीचा सोन्याचा गोप हस्तगत केला. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

          दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.55 वाजता, फिर्यादी नाथराव माणिकराव फड (वय 67, रा. शंकर पार्वती नगर, परळी वै.) हे अंबाजोगाईला जाण्यासाठी परळी बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोप अज्ञात चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी फिर्यादीने 14 ऑगस्ट रोजी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गु.र.नं. 164/2025 भादंवि कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी  शिंदे यांच्या सूचना घेऊन तपास अधिकारी सफौ/613 सौंदनकर यांनी तपास सुरु केला. परळी शहरातील नव्याने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज व सायबर सेलच्या तांत्रिक मदतीच्या आधारावर तपास सुरु करण्यात आला.


तपासादरम्यान, आरोपी प्रकाश श्रीराम जाधव (वय 34, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर, जि. बीड) यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीस खोकर मोहा (ता. शिरूर) येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून सोन्याचा गोप जप्त केला. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक डी. एस. ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. मिसाळ, सफौ/613 सौंदनकर, सफौ/1253 नागरगोजे, पोह/416 साजीद पठाण, पोअं./710 चव्हाण, पोअं./1721 डोंगळे व पोअं./1109 घुगे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !