युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

जिल्ह्यात एकाच दिवशी ३० लाख वृक्षलागवड मोहीम.

 अंबाजोगाई व परळीत वनविभागाकडून २ लाख मिश्र उपवनाची लागवड

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

           बीड जिल्ह्यात आज ७ ऑगस्ट रोजी हरित बीड अभियान राबवण्यात आले. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड येथे वृक्षारोपण करुन शुभारंभ करण्यात आला. तर आजच्याच दिवशी जिल्हाभरात तब्बल ३० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. या अनुषंगाने अंबाजोगाई व परळी येथे वन विभागाकडून जोरदार प्रतिसाद देत दोन लाख मिश्र उपवनांची लागवड करण्यात आली.

  परळी वैजनाथ वन विभागाअंतर्गत अंबाजोगाई व  परळी या ठिकाणी वन विभागाच्या वतीने 'हरित बीड' अभियानात हिरिरीने सक्रिय सहभाग घेत विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये मिश्र रोपवनांची लागवड करण्यात आलख.बीड जिल्ह्यात तीस लाख वृक्षाची लागवड करण्याच्या पहिल्या टप्प्यात परळी वनविभागाने अंबाजोगाई व परळी या ठिकाणी दोन लाख मिश्र रोपवन लागवड केली. वसंतनगर येथील वन विभागाच्या जंगलात वृक्ष लागवड अभियानाचा मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला.यावेळी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे,परळी वनक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड यांच्या हस्ते उपवन लागवड करण्यात आली. यावेळी वसंत नगरचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, परळी वनपाल अनिल मालेवार, वनरक्षक बाळासाहेब नागरगोजे, वनकर्मचारी, पत्रकार आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या