वैद्यनाथ बॅंकेच्या येथील मुख्य शाखेत बँकेचे व्हॉईस चेअरमन रमेशराव कराड, सौ. सुचिताताई कराड, प्रथमेश कराड यांच्या हस्ते
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्रात नामांकित असलेल्या वैद्यनाथ बॅंकेच्या येथील मुख्य शाखेत बँकेचे व्हॉईस चेअरमन रमेशराव कराड, सौ. सुचिताताई कराड, प्रथमेश कराड यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात "श्रीं"ची स्थापना करण्यात आली.
या प्रसंगी बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, डॉक्टर अधिकारी यांसह मान्यवर उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात व “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात श्रींचे आगमन व स्थापना करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा