युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

कोणा सभासदाचे कुठे मतदान?

वैद्यनाथ बँक संचालक मंडळासाठी वैद्यनाथ महाविद्यालय आणि महिला महाविद्यालयात मतदान

सभासद क्रमांक 1 ते 7747 हे वैद्यनाथ महाविद्यालयात तर 11794 पर्यंत महिला महाविद्यालयात मतदान

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीत उद्या रविवारी मतदान होणार आहे. सभासद क्रमांक 1 ते 7747 हे वैद्यनाथ महाविद्यालयात तर 7747 ते 11794 यांचे मतदान हे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात मतदान होणार आहे. मतदाराची ओळख पटविण्यासाठी विविध कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार असून सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

     वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळासाठी रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सभासद क्रमांक 1 ते 7747 यांचे मतदान वैद्यनाथ महाविद्यालयात 19 मतदान केंद्रावर तर 7747 ते 11794 यांचे मतदान हे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात 10 मतदान केंद्रावर मतदान होणार असून मतदारांनी काळजीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मतदाराची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांची यादी

    मतदाराची ओळख पटविण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. 1) भारतीय/राज्य निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र, २. पासपोर्ट, ३. वाहन चालविण्याचा परवाना, ४. आयकर विभागाकडील पॅन कार्ड, ५. केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहित दिलेले ओळखपत्र, ६. राष्ट्रीयकृत बँका / पोस्ट ऑफीस यामधील फोटो असणारे पासबूक, ७. स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र (फोटोसहित), ८. सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे फोटोसहित दिलेले प्रमाणपत्र, ९. सक्षम प्राधिकाऱ्याने फोटोसहित दिलेला अपंगत्वाचा दाखला, १०. मालमत्ताबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणीखत इ. फोटोसहित, ११. फोटोसहीत देण्यात आलेला शस्त्रास्त्राचा परवाना, १२. राष्ट्रीय ग्रामीण योजना खालील फोटो असलेले ओळखपत्र, १३. निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पासबुक, १४. निवृत्त कर्मचाऱ्यांचे विधवा / अवलंबित व्यक्ती यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र, १५. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेल्या आरोग्य विमा योजनेचे फोटो सहित असलेले कार्ड, १६. शिधापत्रिका फोटोसहित, १७. आधार ओळखपत्र यापैकी एक पुरावा मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या