परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
प्रतिक्स मेकअपच्या "श्रीं"ची सौ. अर्चना सोनी यांच्या हस्ते आरती
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नामांकित "प्रतिक्स मेकअप" स्टुडिओमध्ये स्थापन करण्यात आलेल्या "श्रीं"ची आज सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चना सोनी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
प्रेमपन्ना नगरमधील प्रतिक्स मेकअप स्टुडिओमध्ये "श्रीं"ची स्थापना करण्यात आली आहे. येथील "श्रीं"ची विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना आरती करण्याचा मान दिला जातो. आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सौ. अर्चना राजेंद्र सोनी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी संज्ञा सोनी, कोमल लांडगे आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रतिक्स मेकअपचे संचालक, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक सुरवसे व ऐश्वर्या ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. प्रतिभा सुरवसे यांनी स्वागत केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा