लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी घेतली प्रचारात आघाडी

वैद्यनाथ को - ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणूक

लातुर, उदगीर, पानगाव, रेणापूर आदी ठिकाणच्या सभासदांच्या भेटी घेऊन साधला संवाद


लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी घेतली प्रचारात आघाडी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 

       वैद्यनाथ को - ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणूकीत राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. लातुर, उदगीर, पानगाव, रेणापूर आदी ठिकाणी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

      10 ऑगस्ट रोजी वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवार माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, सौ. माधुरी मेनकुदळे, अनिल तांदळे, प्रा. विनोद जगतकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता 13 जागांसाठी मतदान होणार असून यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलमधुन विद्यमान अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेशराव कराड, विजयकुमार वाकेकर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, माहेश्वर निर्मळे, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री हे निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांनी लातूर, रेणापूर, उदगीर आणि पानगाव आधी ठिकाणी सभासदांच्या बैठका घेऊन सविस्तर संवाद साधला. 

      लातूर येथील बैठकीस जेष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, उद्योजक जितेश चापसी, सुधिर कोटलवार,  जन्मथ मामडगे, महावीर कोचेटा, जनार्धन वलकटे, महादेव सिरसाट, रविशंकर मुंडे, चार्टर्ड अकाऊंटंट कासट, तापडिया, संतराम थोरात, देशपांडे, कोरे, धैर्यशील पवार, दत्तात्रय बन, जितेंद्र कोरे यांची उपस्थिती होती. 

       पानगाव येथे सभासदांनी "आम्ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली. यावेळी व्यंकटराव अनामे, सुकेश भंडारे, सतीश अंबेकर, गणेश, करूप, बालाजी बच्चेवार, आदिनाथ फड, एस. आर. कुलकर्णी, रामेश्वर कोरे, युनुस मनियार, सदाशिव पवार, शिवाजीराव जाधव, उद्धवराव दहिफळे, अशोकराव दहिफळे, दत्तात्रय चव्हाण, गणेश चव्हाण, अशोक तोष्णीवाल, उत्तरेश्वर काळकुटे, उमेश जोशी, भास्कर अघाव, जगन्नाथ रायचुरे आदी उपस्थित होते. 

   तर रेणापूर येथील बैठकीला भाजपचे जेष्ठ नेते रविकांत औसेकर, शाखा सल्लागार  दिलीप आकनगिरे, शाम बजाज, रमाकांत वाघमारे, रेणापूर भाजपा शहराध्यक्ष अच्युतराव कातळे, कायदेशीर सल्लागार अँड. प्रशांत अकनगिरे, नरसींग बररूरे, रफीक शिकलकर आदी उपस्थित होते. 

    उदगीर येथे झालेल्या बैठकीत लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी लातूर जिल्ह्यातील एकही मतदान बाहेर जाणार नाही. शंभर टक्के मतदान हे "पॅनल टू पॅनल" केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी भाजपा माजी तालुकाध्यक्ष धर्मपाल नागदरगे, तालुकाध्यक्ष सुनील सावळे, रामदास बेंबडे, शहराध्यक्ष अमोल अणकल्ले, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, अविनाश रायचूरकर, संभाजी फड आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच ठिकाणी उमेदवारांना प्रचंड पाठिंबा मिळाला सर्व मतदारांनी आम्ही जनसेवा पॅनललाच मतदान करणार असल्याचा शब्द यावेळी उमेदवारांना दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !