आराखडा नियोजन विभागाकडे होणार वर्ग

श्री.वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता 286 कोटींवरून होणार 351 कोटींचा!

आराखडा नियोजन विभागाकडे  होणार वर्ग


धनंजय मुंडेंनी मांडली अभ्यासपूर्ण माहिती; दादांचे मानले आभार

बीड (दि. ०७) - पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री वैद्यनाथ प्रभूंच्या मंदिर व परिसराच्या विकास कामांचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेण्यात आला. यावेळी विकास आराखड्याच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या व नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले. 


मंदिर व परिसराचा विकास करताना पौराणिक महत्त्व अबाधित राखून अभूतपूर्व विकास कार्य करण्यात यावे, अशा सूचना अजित दादांनी सर्व संबंधितांना दिल्या. 


वाहनतळ, मेरुगिरी पर्वत परिसरातील कामे, दर्शन मंडप, नंदी, शिव प्रतिमा, उद्यान, प्रवेशव्दारे यांसह लागणाऱ्या अधिकच्या जमीन अधिग्रहण करण्याची जबाबदारी यावेळी धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करत आराखडा कामातील बारकावे सर्वांच्या लक्षात आणून दिले.


वाढीव जागेसह विविध कामांच्या पूर्ततेसाठी वाढीव निधीची तरतूद करण्याबाबत विनंती करताच अजित दादांनी ती मान्य केली असून, आता आराखडा २६८.६८ कोटिंवरून ३५१ कोटी इतका वाढवण्यास मान्यता दिली असून, या कामाला गती व निधी मंजूर करता यावा यासाठी हे काम नियोजन विभागाकडे वर्ग करण्यासही अजित दादा पवार यांनी मान्यता दिली आहे. 


यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित दादा पवार यांचे सर्व परळीकर व शिव भक्तांच्या वतीने आभार मानले, बैठकीस आ. विक्रम काळे, आ. नमिता मुंदडा, सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पालक सचिव श्री. वाघमारे, आर्किटेक्ट हेमंत पाटील, परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, श्री. बेंडले, श्री. ढवळे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !