पुणे जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू
मराठा आंदोलनाच्या लढ्यात केज तालुक्यातील मराठा योद्धा पडला धारातीर्थी
केज तालुक्यातील मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा मुंबईकडे जात असताना पुणे जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू
केज :- केज तालुक्यातील वरपगाव येथून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनात मुंबईकडे निघालेल्या वरपगाव येथील सतीश देशमुख या ४५ वर्ष यांचा पुणे जिल्ह्यात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे.
केज तालुक्यातील वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा देशमुख हे त्यांच्या मित्रा सोबत मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबई येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. ते पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे आले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याने केज तालुक्यात एक मराठा योद्धा आरक्षणाच्या लढाईत कामी आला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचा देखील विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला होता. त्यांच्या पश्चात पत्नी नंदुबाई, मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा