दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली.....!
पत्रकार संतोष जुजगर यांना आजीशोक :१०३ वर्षांच्या इंदिराबाई हुगे यांचे वृद्धापकाळाने निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –
येथील वीरशैव लिंगायत कोष्टी समाजाच्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ महिला हैदराबाद बँकेशेजारी, मोंढा हालगे गल्ली येथील रहिवासी श्रीमती इंदिराबाई शंकरआप्पा हुगे (वय १०३) यांचे वृद्धापकाळाने (आज दि.६ ) रात्रीच्या सुमारास निधन झाले. पत्रकार संतोष जुजगर यांच्या त्या आजी होत.
श्रीमती इंदिराबाई हुगे या अत्यंत कष्टाळू, संयमी व धार्मिक वृत्तीच्या महिला होत्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी कुटुंबासाठी समर्पित केले. एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्या परिचित होत्या. संतोष व वामन या दोन नातवांवर त्यांचा विशेष स्नेह होता. हुगे व जुजगर परिवासाठी एक आधारवड असे आयुष्य त्यांनी घालवले. धार्मिक वृत्तीच्या इंदिराबाई यांची पवित्र श्रावणात वयाच्या १०३ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे स्नेही,आप्तेष्ट व परिचितांमधून शोकसंवेदना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगी सौ. गंगाबाई विष्णू आप्पा जुजगर, नातू वामन व संतोष जुजगर, नातसुना, तीन पणतू, एक पणती असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जुजगर परिवारावर कोसळलेल्या या दु: खात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
आज अंत्यविधी
दरम्यान, दिवंगत इंदिराबाई यांच्या पार्थिवावर आज दि.७ रोजी परळी वैजनाथ येथे अंत्यविधी होणार आहेत. सकाळी १० वा. जुजगर यांचे राहते घर, हैदराबाद बँकेशेजारी, मोंढा हलगे गल्ली, परळी वैजनाथ येथून अंत्ययात्रा निघेल.
भावपुर्ण श्रद्धांजली
उत्तर द्याहटवा