लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या फेरीला सभासदांचा भरभरून प्रतिसाद
बॅंकेच्या प्रगतीसाठी आमचे मत तुम्हालाच - मतदारांनी दिला शब्द
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
वैद्यनाथ बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, त्यामुळे आमचे मत केवळ तुम्हालाच आहे. कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आम्ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनाच मत देणार आहोत अशी ग्वाही आज सभासद मतदारांनी दिली. वैद्यनाथ बँक निवडणूकीसाठी राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या फेरीला आज माणिक नगर आणि विविध ठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वैद्यनाथ को - ऑपरेटिव्ह बँकेसाठी रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे चार उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. यात माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे, सौ. माधुरी मेनकुदळे, अनिल तांदळे, प्रा. विनोद जगतकर यांचा समावेश आहे. 13 जागांसाठी विद्यमान अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेशराव कराड, विजयकुमार वाकेकर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, माहेश्वर निर्मळे, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री हे उमेदवार आहेत.
आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारासाठी भजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - शिवसेना (शिंदे) महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात भव्य प्रचार फेरी काढली. या फेरीचा शुभारंभ माणिक नगरमधील कल्याणकारी हनुमान मंदिर येथून करण्यात आला. न्यु माणिक नगर, नाथ टॉकीजमागील शिवाजी नगर, पॉवरलूम परिसर, इंडस्ट्रियल एरिया, स्नेह नगर आदी आदी भागात जाऊन कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटी घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केले.
प्रचार फेरीला मतदारांचा प्रतिसाद
लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभासद मतदारांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करून वैद्यनाथ बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी आम्ही कायम सोबत आहोत अशी ग्वाही देऊन या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्वच उमेदवारांना आम्ही एक हाती मतदान करणार आहोत असा शब्द दिलाय.
या प्रचारफेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, भाजपाचे जेष्ठ नेते श्रीराम मुंडे, बँकेचे बिनविरोध निवड झालेले संचालक अनिल तांदळे, प्रा. विनोद जगतकर यांच्यासह सुरेश टाक, योगेश मेनकुदळे, राजेंद्र ओझा, महादेव इटके, राजेंद्र सोनी, उमेश खाडे, अय्युब भाई पठाण, अश्विन मोगरकर, अनिश अग्रवाल, सुशील हरंगुळे, रविंद्र परदेशी, अॅड. मनजित सुगरे, शफिया इनामदार, सौ. चित्रा देशपांडे, सौ. चंदाताई ठोंबरे, दत्ताभाऊ सावंत, मोहन जोशी, नितीन समशेट्टी, संतोष सामत, संजय देवकर, वैजनाथ रेकने, ज्ञानोबा सुरवसे, श्रीपाद शिंदे, ज्ञानेश्वर होळंबे, संजय शिंदे, अभिजीत धाकपडे, अमित केंद्रे, गणेश सुरवसे, चंद्रप्रकाश हालगे, विश्वजीत कांबळे, गुड्डूताई आदोडे, सौ. गायकवाड, के. डी. उपाडे, जितेंद्र मस्के, एजाजभाई, शेख खदीर, सचिन स्वामी, प्रशांत कराड, विजय दहिवाळ, योगेश पांडकर, अच्युत जोगदंड, बंडू नाना कोरे, दिलीप नेहरकर, उमेश निळे, शेख अनिस, शेख खदीर, वैजनाथ पवार, शिवलिंग वाघमारे, सचिन स्वामी,मुकेश पाटील आदींसह भजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - शिवसेना (शिंदे) महायुती आणि महायुती प्रचार समितीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा