यशःश्रीवर प्रज्ञाताई मुंडे यांनी पेढा भरवून केले सर्व विजयी संचालकांचे अभिनंदन
वैद्यनाथ बँकेचे विजयी उमेदवार गोपीनाथ गडावर नतमस्तक; डाॅ प्रीतम मुंडेंनी केला सत्कार
यशःश्रीवर प्रज्ञाताई मुंडे यांनी पेढा भरवून केले सर्व विजयी संचालकांचे अभिनंदन
परळी वैजनाथ।दिनांक १२।
वैद्यनाथ अर्बन बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केलेले सर्वच्या सर्व विजयी उमेदवारांनी आज संध्याकाळी गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. याठिकाणी डाॅ. प्रीतम मुंडे यांनी सर्वांचा सत्कार केला तर यशःश्री निवासस्थानी प्रज्ञाताई मुंडे यांनी सर्वांचे पेढा भरवून अभिनंदन केले.
वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. सर्वच्या सर्व १७ संचालक यात मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले. ना. पंकजाताई मुंडे यांचे या बँकेवर पुन्हा एकदा वर्चस्व कायम राहीले. निकालानंतर बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड यांच्यासह सर्व संचालकांनी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालिका व माजी खासदार डाॅ.प्रितम मुंडे यांनी याठिकाणी सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यानंतर हया सर्व उमेदवारांनी यशःश्री निवासस्थानी येऊन प्रज्ञाताई मुंडे यांची भेट घेतली व आभार मानले. प्रज्ञाताई मुंडे यांनी प्रत्येक विजयी उमेदवाराला स्वतःच्या हाताने पेढा भरवून सर्वांचे अभिनंदन केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा