राष्ट्रीय सेवा योजनेचा अनोखा उपक्रम
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवांसमवेत साजरी केली राखी पौर्णिमा
राष्ट्रीय सेवा योजनेचा अनोखा उपक्रम
परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)
येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता.०८) येथील पोलीस ठाण्यात राखी पोर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे सह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे औक्षण करून राख्या बांधल्या.
शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अनोखा उपक्रम राबवत पोलीस बांधवा समवेत राखी पौर्णिमा साजरी केली. पोलीस बांधवांना कोणताही सण साजरा करता येत नाही. नेमके यावेळी बंदोबस्तात वाढ केलेली असते. यामुळे सण, उत्सव साजरे करता येत नाहीत म्हणून येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पोलीस बांधवांना परिवारातील सदस्यांप्रमाणे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून, फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या. पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थिनींचे रक्षण करण्यास आम्ही सदैव तयार असतो. फक्त न घाबरता कोणी त्रास देत असेल तर सहन न करता आम्हाला कळवावे, यासाठी पोलीस प्रशासनाने मोबाईल नंबर,वाटसाप नंबर दिलेले आहेत, आम्ही नाव गुपीत ठेवून योग्य कारवाई करु, २४×७ आम्ही तयार असतो. सह पोलीस निरीक्षक नितीन गट्टावार यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानत विद्यार्थिनींनी आम्हाला आज राख्या बांधून संस्कृतीचे पालन केले आहे. एक वेगळे नाते संबंध जोडले आहेत. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विवेकानंद कवडे कनिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा प्रविण फुटके, प्रा डॉ कचरे,प्रा डॉ गुळभिले, प्रा डॉ विना पारेकर, मारोती देमगुंडे, हेमलता दुधाट आदि उपस्थित होते. यावेळी दोन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीस बांधवांना राख्या बांधण्यात आल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा