इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

प्रथम स्मृतीदिन : विनम्र अभिवादन: विशेष प्रासंगिक लेख.....

 कै.गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) : एक कष्टमय प्रवासाचा तेजस्वी प्रकाश






            "जगण्यासाठी फक्त जन्म घेणे पुरेसे नसते, आयुष्याला अर्थ द्यायला लागतो त्याग, कष्ट आणि जबाबदारीचा आधार."

            कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) यांचा जन्म १ ऑगस्ट १९३० रोजी धारासुर, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथे झाला. त्यांचे वडील रामभाऊ व्यंकोबा मुंडीक आणि आई मधुराबाई रामभाऊ मुंडीक हे कुटुंब सन्मानाने जीवन जगणारे होते. मामाकडे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या कष्टमय जीवनाची सुरुवात तेलंगणामधील कोल्हारी, ता.बोच जि. आदिलाबाद येथे केली.फक्त १३ वर्षांचे असतानाच त्यांनी निजामाबाद येथे सुवर्णकार कारागीरीचे काम शिकले व  सुरू केले. वयाच्या कोवळ्या वळणावर जेव्हा इतर मुले खेळण्यात रमलेली असतात, तेव्हा गंगाधररावांनी कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून कामात स्वतःला झोकून दिले.

             सिंगापूर ता. बोच, जिल्हा आदिलाबाद येथे वडिल रामभाऊ मुंडीक यांनी  १६ एकर शेती घेतलेली होती. ही शेती वडिलांकडून वारसा हक्काने त्यांच्याकडे आली होती. परंतु काही कारणास्तव, राज्यातील परिस्थितीमुळे स्वतः शेती करू शकत नसल्याने त्यांनी ती दुसऱ्यांना मशागतसाठी दिली. कालांतराने त्या व्यक्तीने कुळ लावून ती शेती स्वतःच्या नावावर केली – हे दु:ख त्यांच्या मनात ठसठसत राहिले. बालवयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. धारासूर या मुळगावी परतून सोनारी (सोने घडविणे) कारागीर म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला. पाच भाऊ आणि एक बहीण असलेल्या कुटुंबाला सांभाळताना त्यांनी स्वतःला घराच्या प्रमुखपदावर प्रस्थापित केले. ते फक्त कुटुंबप्रमुख नव्हते, तर एक आधारस्तंभ होते. मराठी, हिंदी, उर्दू, मोडी आणि तेलुगू या भाषांमध्ये त्यांना चांगले ज्ञान होते. १९६५ साली त्यांनी धारासूर येथे स्थायिक होऊन पाच एकर शेती घेतली. हीच शेती पुढे त्यांच्या जीवनाचा कणा ठरली. त्यातून वर्षाचे अन्नधान्य उत्पादन झाले आणि कुटुंबाचा चरितार्थ सुरू झाला. 

           कै.गंगाधरराव वैयक्तिक आयुष्यही भरभरून जगले.दोन मुले, दोन सूनबाई आणि त्यांचे नातवंडं यांचा प्रेमळ परिवार होता. त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि आपल्या मुलांना योग्य शिक्षण दिले. एक मुलगा ॲड.सुरेश गंगाधरराव मुंडीक हे एम.काॅम., जीडिसी आणि एएलएलएम शिक्षण घेतलेले आहेत, तर दुसरा मुलगा रमेश गंगाधरराव मुंडीक यांनी बी.ए. शिक्षण पूर्ण करून परळी-वैजनाथ येथे सुवर्णकार कारागीर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. आज रमेश मुंडीक धारासुरकर यांची सुवर्णपेढी परळीतील सराफा बाजारपेठेतील एक प्रमुख पेढी ठरलेली आहे. त्यांच्या नातवंडांमध्येही मोठी शैक्षणिक प्रगती दिसते – एक नातू आयटी इंजिनिअर म्हणून पुण्यात कार्यरत आहे, दुसरा पुणे प्राइम टाइम न्यूज मध्ये टिव्ही रिपोर्टर म्हणून कार्यरत आहे.त्यांना तीन नाती असुन तर एक नात ई ॲण्ड टेक्नि. इंजिनिअर तर दुसरी नात बी.फार्मसी शिक्षण घेत आहे. एक नात प्राथमिक शिक्षण घेत आहे.

    कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक यांचा जीवन प्रवास हा एक प्रेरणादायी कथा आहे. हा जीवनप्रवास सांगतो की, परिस्थिती कितीही कठीण असो, जर मनोबल मजबूत असेल आणि कष्टाची तयारी असेल, तर जीवनात काहीही अशक्य नाही. त्यांनी कधीही परिस्थितीवर तक्रार केली नाही, उलट त्याचा सामना करत संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवले, शिकवले, आणि वाढवले. त्यांनी परळी-वैजनाथ येथे आपला शेवटचा श्वास ४ सप्टेंबर २०२४ रोजी घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे एक मार्गदर्शक तारा हरपला. मात्र त्यांनी एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून व आधारवड म्हणून पार पाडलेली जबाबदारी ही खरोखरच प्रेरणादायी अशीच आहे.त्यांची मुले ॲड. सुरेश व रमेश हे सामाजिक जाणीव ठेवत प्रगतीशील कामात कार्यरत असुन आपल्या वडिलांचे कष्ट,त्याग व जबाबदारी या विचारावरच वाटचाल करीत आहेत.कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक यांचे आज प्रथम वर्षश्राध्द  त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस  विनम्र अभिवादन!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!