मिसेस महाराष्ट्र गौरव पुरस्काराने मनिषा जुगदर सन्मानित 


परळी वैजनाथ दि. २८ (प्रतिनिधी)

  तालुक्यातील सिरसाळा येथील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षा मनिषा जुगदर यांना शिवराज बहुउद्देशीय संध्या विरार मुंबई यानी आयोजित केलेल्या मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

             शिवराज बहुउद्देशीय संस्था विरार मुंबई येथे मिसेस महाराष्ट्र या राज्यस्तरीय स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकमेव स्पर्धक म्हणून मनिषा जुगदर यांची निवड झाली होती. या स्पर्धेत विविध राऊंड घेण्यात आले. या सर्व राऊंड मध्ये मनिषा जुगदर विजेत्या होत, अंतिम राऊंड मध्ये सहभागी झाल्या. यामध्ये मिसेस इंडिया प्रमाणे बौध्दिक क्षमता तपासण्यात आली यासाठी विविध प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे देत मनिषा जुगदर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी शिवराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मनिषा जुगदर यांना मिसेस महाराष्ट्र गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याबदल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, सचिव प्रा मधुकर शिंदे, प्रा प्रविण फुटके यांच्यासह पदाधिकारी व सिरसाळा येथील समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !