प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक कार्यालयही लवकरच बीडला होणार
ना. पंकजा मुंडेंनी दिले निर्देश ; जिल्हयातील उद्योजकांच्या मागणीची तातडीने घेतली दखल
जिल्हयातील उद्योगांच्या समस्या निवारणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आता प्रत्येक बुधवारी बीडमध्ये असणार
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक कार्यालयही लवकरच बीडला होणार
मुंबई।दिनांक २८।
राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील उद्योजकांच्या मागणीची तातडीने दखल घेतली असून त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील उद्योगांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आता आठवड्यातील प्रत्येक बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बीड मध्ये उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक कार्यालय देखील लवकरच बीडमध्ये आणण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे प्रयत्नशील आहेत.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे मराठवाडा विभागाचे प्रादेशिक कार्यालय सध्या छत्रपती संभाजीनगर येथे असून उप प्रादेशिक कार्यालय जालना, नांदेड, लातूर आणि परभणी येथे आहेत. बीड जालन्याला तर परळी परभणीला जोडलेले आहे. बीडला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्वतंत्र उप प्रादेशिक कार्यालय असावे अशी उद्योजकांची मागणी आहे, त्यानुसार ना. पंकजाताई मुंडे यासाठी प्रयत्नशील असून बीडचे कार्यालय प्रस्तावित आहे.
*उप प्रादेशिक अधिकारी दर बुधवारी बीड मध्ये*
--------
स्वतंत्र कार्यालय होईपर्यंत जिल्हयातील औद्योगिक व उद्योगांशी संबधित समस्या हाताळण्यासाठी एखादा उप प्रादेशिक अधिकारी असावा अशी उद्योजकांची मागणी होती, त्यानुसार ना. पंकजाताई मुंडे यांनी आज पर्यावरण विभागाला तातडीने निर्देश दिले.यासंदर्भात छत्रपतीसंभाजीनगरचे प्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी परिपत्रक काढले असून बीड येथील उद्योजकांच्या तसेच औद्योगिक संघटनांच्या अडी-अडचणी / समस्यावरील चर्चा करणेसाठी व निवारण करणेसाठी उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जालना हे आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी, जिल्हा उद्योग केंद्र, संचेती बिल्डिंग, गुड लक हॉटेल जवळ, एम.एस.ई.बी. ऑफिस समोर, जालना रोड, बीड येथे उपलब्ध असतील असे म्हटले आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा