लाखो पुरुष नर्सिंग विद्यार्थी, पुरुष परीक्षार्थी, पुरुष नर्सिंग ऑफिसर्स होणार कायमचे बेरोजगार!
पुणे......केंद्र आणि राज्य सरकार जाणीवपुर्वक बेरोजगारांचे कारखाने तयार करत असल्याचा "मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य" यांचा तीव्र आक्षेप, आरोप असून *विद्यार्थ्यांना भविष्यात अंधारात घेऊन जाण्याचे महापाप केंद्र व राज्य सरकार करत आहे.
मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांचे राज्यभरात गेली तीन महिन्यापासून *संविधानिक, लोकशाही मार्गाने आंदोलने* चालू असून *शासन* त्याकडे डोळेझाक करत असून मेल *नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला* आहे तो कधीही उफाळून येऊ शकतो याची *संपूर्ण जबाबदारी शासनाला घ्यावी* लागेल.
महाराष्ट्रातील *सर्व पक्षीय 288* लोकप्रतिनिधी, *वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब, DMER सचिव, प्रबंधक, संचालक,सदस्य,विधान परिषद सदस्य*, लोकसभा सदस्य तसेच सर्व महाराष्ट्रातील *जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी* यांना सुद्धा समितीच्या वतीने निवेदन देत *शांततेच्या मार्गाने आजघडीला सुद्धा आंदोलन चालू* असून
शासकीय AIIMS/DMER *आधिपरिचारिका पदभरती* मध्ये लिंगभेद, अन्याय करत *महिला आरक्षण 80 %* आणि *पुरुष आरक्षण फक्त 20%* लिंगभेदी नियम असा आर. आर. लागू झाला त्याबरोबरच *याअगोदर DHS मध्ये सुद्धा महिला नर्सेस 90%.... पुरुष नर्सेस 10% आरक्षण चालू असून त्यामध्ये सुद्धा लिंगभेद,अन्याय सुरू आहे* त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असून *त्याविरोधात देखील संपुर्ण भारतातील व महाराष्ट्रातील सर्व* नर्सिंग संघटना, नर्सिंग शिक्षण संघटना,आरोग्य कर्मचारी संघटना, सर्व परिचर्या निगडीत संस्था, घटक,*खाजगी नर्सिंग संस्थाचालक*, प्राचार्य, शिक्षक,मेल नर्सिंग विद्यार्थी, पालक आणि *नर्सिंग ऑफिसर्स*, स्टडी सर्कल नर्सिंग करियर अकॅडमी ,पालक , हितचिंतक *रस्त्यांवर उतरत, निषेध करत आंदोलन करत असून सरकार विरोधी प्रचंड संतापाची* लाट पसरली असून *पुरुष उमेदवारांचे भवितव्य सद्यातरी अंधारात दिसत असून, बेरोजगार होऊन सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ शासनाने आणली आहे* लिंगभेद करणारा अन्यायकारक आर. आर. केंद्र व राज्य सरकारने तात्काळ रद्द करावा अशी मागणी मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्य समन्वयक सतीश सर्वगोडे, आदी बनसोडे, डेव्हिड लोखंडे, राजाभाऊ राठोड, अजय मराठे,अनिकेत गायकवाड,दुर्गादास शिंदे, सम्यक जमदाडे, ऋषिकेश गांगर्डे,शंकर नाईकनवरे, सचिन खंदारे, राहुल सानप, महारुद्र मुंडे, अजित गित्ते, शुभम काकड , रणजीत आंधळे, किरण घाडगे, सचिन कसोटे, रेश्मा शेख, रवींद्र मारकड, रवींद्र पुराणिक, प्रा.संजय वाघमारे, नीता रामटेके, कल्याणी गेडाम, विश्वजित कांबळे, डॉ.राहुल जंवजाळ,वसुधा ठोके,संगीता धुताडमल, पृथ्वी काळे, निलेश आघाव, रोशन मुंडे, अर्जुन गुट्टे आणि सर्व मेल नर्सिंग विद्यार्थी, नर्सिंग ऑफिसर्स यांनी केली आहे अशी माहिती मेल नर्सेस बचाव समिती चे राज्य समन्वयक अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा