आंदोलनाचा इशारा....निवेदन....
विविध मागण्यांसाठी बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन चा १८ पासून साखळी उपोषणाचा इशारा
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
विविध मागण्यांसाठी बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन ने १८ तारखे पासून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन व केंद्रशासन यांनी त्याच्याकडील येणे असलेली सर्व प्रकारची रक्कम जुन २०२५ अखेर जिल्हास्तरावर पाठवून दिली आहे व जिल्हास्तरावरून सर्व तालुकास्तरावर पाठवून देण्यात आली आहे. जिल्हातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी जुन २०२५ पर्यंतचे सर्व लाभ आशांना दिले आहते. फ़क्त आपल्याच परळी तालुक्यात देण्यात आले नाही. जाणुन बूजुन आशाच्या मागण्यांकडे दूर्लक्ष करण्यात येत आहे.
१.केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २०२१ ते मार्च २०२२ या काळातील प्रती महिना १००० प्रमाणे ६००० सहा हजार देण्यात यावा.२. जुन अखेर आशाचे केंद्र व राज्य सरकारचे मानधन देण्यात यावे.३. आरोग्यवर्धिनीचे थकित ३ वर्षाचे मानधन देण्यात यावे तसेच यापुढे आरोग्यवर्धिनीचे मानधन दरमहा देण्यात यावे.४. आयुष्यमान कार्ड, सी बँक, आभा कार्ड, अॅडल्ट बीसीजी, टीबी सर्व्हे इत्यादी मानधन देण्यात यावे ५. परळी शहरातील आशाचा कॅरीयर भत्ता देण्यात यावा. ६. कुसुम सर्व्हेचे मानधन देण्यात यावे.या मागण्या दिनांक. १७.०८.२०२५ पर्यत मान्य न केल्यास दिनांक. १८.०८.२०२५ पासून तालुका आरोग्य कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा आशा लांडगे, हेमा काळे, किरण सावजी, फरजाना शेख ,अनिता चाटे, सुवर्णा रेवले,भारती राख,लता आघाव,अर्चना मस्के , उमा वाघमारे, आशा देशमुख , राजश्री थावरे ,अनिता गिराम , छाया रणदिवे, सावित्रा कदम,सुवर्णमाला मुंडे,सुनिता होंळबे आदींनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा