Congratulations:सर्व स्तरातून अभिनंदन
परळीतील पो.ह.मारुती मुजमुले यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती
सर्व स्तरातून अभिनंदन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले सर्व परिचित पोलीस कर्मचारी मारुती द्वारकोबा मुजमुले यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. या बढती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील पोलीस हवालदार पदावरील पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी नुकतीच जाहीर केली असुन यामध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले व एक सुसंस्कृत, सुस्वाभावी, संयमी पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेले मारुती मुजमुले यांची पदोन्नती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांना मिळालेल्या या भरतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा