Congratulations!!!!! राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश!

नीट-पीजी मध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या अकराशेत पटकावले स्थान : डाॅ.प्रज्वल उखळीकरची १०९५ रॅन्क मिळवत यशाला गवसणी



 

परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....

      वैद्यकीय उच्च शिक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षेत (नीट- पीजी) चि.डाॅ. प्रज्वल दिनकरराव उखळीकर (जोशी) याने देशातील पहिल्या अकराशे यशस्वितांमध्ये स्थान मिळवले आहे. नीट- पीजी 2025 परीक्षेत त्याने राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले असुन लाखोंच्या स्पर्धेत १०९५ वा रॅन्क मिळवत यशाला गवसणी घातली आहे.या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

      नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) कडून वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असणार्‍या नीट-पीजी 2025 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी २.४२ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती.ही परीक्षा ३ ऑगस्ट रोजी देशभरातील ३०१ शहरांमधील १०५२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा, पोस्ट-एमबीबीएस डीएनबी, सहा वर्षांचा थेट डीआरएनबी तसेच एनबीईएमएस डिप्लोमा अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. ऑल इंडिया कोट्यातील ५० टक्के जागा, डीम्ड आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीजच्या १०० टक्के जागा आणि ऑल इंडिया ओपन DNB च्या १०० टक्के जागांवर पात्र उमेदवारांना प्रवेश दिला जातो.या परीक्षेत चि.डाॅ. प्रज्वल दिनकरराव उखळीकर (जोशी) याने देशातील पहिल्या अकराशे यशस्वितांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने लाखोंच्या स्पर्धेत १०९५ वा रॅन्क मिळवत यशाला गवसणी घातली आहे.

       चि.डाॅ.प्रज्वल हा परळी वैजनाथ येथील पत्रकार प्रा.रविंद्र जोशी यांचा पुतण्या आहे.चि. डाॅ. प्रज्वलचे प्राथमिक शिक्षण वसमतनगर येथे तर माध्यमिक शिक्षण परभणी येथे झालेले आहे. त्याचे एमबीबीएस चे शिक्षण तेरणा मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल नवी मुंबई येथे पुर्ण झालेले आहे. जिद्द, अभ्यासातील सातत्य व कठोर मेहनत यातून त्याने हे घवघवीत यश मिळवले आहे. या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Congratulations 



टिप्पण्या

  1. " धन्य त्यांची माता पिता" सरांचं खूप खूप अभिनंदन अतिशय सुंदर त्यांना यश मिळाले आहे.
    त्यामुळे त्यांचे व त्यांचे पूर्ण परिवाराचे खूप खूप अभिनंदन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !