Congratulations!!!!!
प्रा. मंजुश्री राऊत-सिनगारे यांना 'कै. शांताबाई बोराळकर स्मृती पारितोषिक' प्रदान
-----------------------------------
अंबाजोगाई: येथील श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक विद्यालयातील प्रा. मंजुश्री राऊत-सिनगारे यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना गृह विज्ञान विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल 'कै. शांताबाई बोराळकर स्मृती पारितोषिक' देऊन सन्मानित करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. डॉ. विजय फुलारी, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, ज्येष्ठ कृषीतज्ञ विजयअण्णा बोराडे, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, डॉ. भारत खंदारे आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे यांचीही उपस्थिती होती.
अंबाजोगाई येथील श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव मा. राजकिशोर (पापा) मोदी, संस्थापक अध्यक्ष श्री. भूषण मोदी आणि कार्यकारी संचालक संकेत भैय्या मोदी यांनीही प्रा. मंजुश्री राऊत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य कुलकर्णी मॅडम, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रा. उस्मानी, तसेच सहकारी प्रा. गीते, डॉ. होळकर, प्रा. डॉ. गीते, प्रा. कदम, प्रा. सोमवंशी, प्रा. यादव आणि क्लर्क श्री. गोस्वामी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे यांच्या सहचारिणी असलेल्या प्रा. मंजुश्री राऊत-सिनगारे यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा