Public appeal:Nilkanth Chate
वैद्यनाथ बॅंकेला शेड्यूल्ड दर्जा मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनललाच विजयी करा- निळकंठ चाटे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ बँकेमध्ये ठेवी वाढवून शेड्युल्ड दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केले आहे.
केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात विस्तार आणि नामांकित असणाऱ्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळासाठी उद्या रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. सर्वसामान्य व्यापाऱ्यांना, छोट्या - मोठ्या गरजू कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणारी व ठेवीदारांचा विश्वास असणाऱ्या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनेलच्या उमेदवारांनाच निवडून देऊन सुरक्षित हातात बँक देण्याचे आवाहन करून ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून विश्वास कमावला असल्याचे म्हटले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आपल्या कार्यकाळात बँकेची भरभराट करून राज्यभरात शाखांचा विस्तार केला. पर्यावरण, वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडे बँकेच्या उज्वल भविष्यासाठी नियोजन व दूरदृष्टी आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनेलचे सर्वच उमेदवार उच्चशिक्षित आहेत असे सांगून निळकंठ चाटे म्हणाले. सभासदांचा विमा, शैक्षणिक कर्ज, डिजिटल सेवा, तात्काळ कर्जाच्या सुविधा वैद्यनाथ बँकेमार्फत दिल्या जातात. एन पी ए कमी करणे, शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवणे, ठेवीदारांच्या ठेवी 100 टक्के सुरक्षित करणे, स्वमालकीच्या शाखात वाढ करणे, सभासदांना दुर्धर आजारात आर्थिक मदत, सभासदांचा अपघाती विमा ही उद्दिष्टे व योजना घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनेल या निवडणुकीत उतरले आहे. भविष्यात वैद्यनाथ बँकेला देशातील अव्वल बँक बनवण्यासाठी पॅनेलच्या दोन गटातील सर्व 13 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा