Public appeal:Prakash Joshi...

लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचा ऐतिहासिक विजय निश्चित- प्रकाश जोशी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीत राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील लोकनेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचा विजय निश्चित असुन मतदारांनी भुलथापांना बळी न पडता लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनाच मतदान करावे असे आवाहन पॅनलचे उमेदवार प्रकाश जोशी यांनी केले आहे.

     राज्यातील अतिशय विश्वासहर्ता प्राप्त  असलेल्या वैद्यनाथ बँक निवडणूकित विरोधकांनी विरोधाला विरोध म्हणून केविलवाणा प्रयत्न सुरू केले आहेत. पण जनतेला सर्व बाबी ओळखून असल्याने, लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल च्या सर्वच उमेदवारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आणि याअगोदर चार संचालक बिनविरोध निवडून आले असल्याने, विरोधकांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होऊन सर्वच उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे. भविष्यात विरोधाला विरोध ही प्रवृती नामशेष करण्यासाठी, सर्वंच सभासदांनी भरघोस मतदान लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल च्या सर्वच उमेदवारांना द्यावे असे आवाहन लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार प्रकाश जोशी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !