Rakshabandhan : राखी बांधण्यासाठी यंदा कोणता कालावधी योग्य?
यंदा दिवसभरात कधीही बांधा राखी!
श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. 'रक्षाबंधन' (Raksha Bandhan) म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या शुभ दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या मनगटावर एक पवित्र धागा बाधून ती त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. श्रावण पौर्णिमेला आपण 'रक्षाबंधन' आणि 'नारळी पौर्णिमा' साजरी करतो. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतिक असलेला 'रक्षाबंधन' सण यंदा 09 ऑगस्टला साजरा होणार आहे.
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरं केलं जातं. यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे. मात्र, उदय तिथीनुसार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. सौभाग्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग 9 ऑगस्टच्या सूर्योदयापासून ते दुपारी 2:15 पर्यंत राहील.
पंचांगानुसार, 09 ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ काळ असेल कारण भद्राकाळ 8 ऑगस्ट रोजी संपलेला असेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा