वैद्यनाथ बँक ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर
जलद सेवा देण्यासाठी लवकरच डिजिटल सेवांचा विस्तार - विजयकुमार वाकेकर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक ही ग्राहकांच्या सेटिंग सेवेसाठी सदैव तत्पर असलेली आर्थिक संस्था असून जलद सेवा देण्यासाठी लवकरच डिजिटल सेवांचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार विजयकुमार वाकेकर यांनी दिली असुन या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पॅनलचे उमेदवार विजयकुमार वाकेकर यांनी केले आहे.
वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळासाठी उद्या रविवारी मतदान होणार असुन आज प्रचाराचा समारोप झाला. यावेळी विजयकुमार वाकेकर म्हणाले की, वैद्यनाथ बँक ही केवळ मराठवाडा असे नव्हे तर महाराष्ट्रात नावारूपाला आले असून राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आगामी काळातही बँक नवनवे यशोशिखर गाठील असा विश्वास व्यक्त करून भारतातील अव्वल तीस नागरिक सहकारी बँकांच्या यादीत वैद्यनाथ बँकेचे नाव समाविष्ट होईल यासाठी हे संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे. आर्थिक अडचण असलेल्या सभासदांसाठी तातडीने कर्ज देणारी बँक म्हणून वैद्यनाथ बँकेच्या नावलौकिक आहे. बँकेने आजपर्यंत कोणताही पक्षभेद किंवा जातीभेद न करता गरजवंताला कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज असो किंवा व्यापाऱ्यांना लागणारे तातडीचे कर्ज असो बँक सदैव ग्राहकांच्या हितासाठी तत्पर राहिले आहे.
आगामी काळातही बँक आर्थिक आघाडीवर नवे व शांत स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करून होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही यावेळी उमेदवार विजयकुमार वाकेकर यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा