Aarti.....

 Navratrotsav: भवानीनगर दुर्गोत्सव मंडळ समाजकार्याच्या आघाडीवर – बाजीराव भैया धर्माधिकारी




परळी (प्रतिनिधी) –

भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित देवीची आरती उत्साहात व भक्तिभावाने परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी देवीचे विधीवत पूजन करून धार्मिक वातावरणात आरती पार पडली.

ParliVaijnath: या प्रसंगी बोलताना बाजीराव भैया धर्माधिकारी म्हणाले की, “भवानीनगर दुर्गोत्सव मंडळ हे परळी शहरातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असून, भोजराज पालीवाल  मार्गदर्शनाखाली मंडळाने आरोग्य शिबिरे, रोगनिदान शिबिरे तसेच महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित करून समाजासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे.

ते पुढे म्हणाले की, “श्री भोजराज पालीवाल हे ठाकरे यांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख असून, त्यांनी आजपर्यंत जनतेच्या प्रश्नांवर विविध आंदोलने करून आवाज उठवला आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.

सुनील शिरसाठ यांनी बाजीराव भैया धर्माधिकारी यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाच्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुनील शिरसाट.भोजराज पालीवाल यांनी केले. यावेळी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भोजराज पालीवाल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायणराव सातपुते, डॉ. तुषार पिंपळे, गजराज पालीवाल, महेश उर्फ पप्पू केंद्रे, संदीप चौधरी, रामेश्वर मुंडे, बालासाहेब गवळी, राम आंधळे, इंगळे टेलर, दहिफळे टेलर, गोविंद मस्के, कैलास जोगदंड, विजय जाधव, हनुमान शितापर आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !