परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....

क्रूरता आणि लैंगिक अत्याचाराचे 'हैवानी' क्रुर कृत्य: चिमुकलीची हाकिकत ऐकाल तर काळीज तुटल्याशिवाय राहणार नाही !




 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       पंढरपूर येथील एका मजूर कुटुंबातील सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना काल दिनांक 31 रोजी घडली. या घटनेने मन सुन्न करून टाकले आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असली तरी पीडित चिमुकलीने कथित केलेली हकीकत अंगावर शहारे आणि काळीज पिळवटून टाकणारी आहे.      

      केवळ वयवर्ष सहा असणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना परळीच्या रेल्वे स्थानकात घडल्यानंतर याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी तातडीने बरकत नगर मधील 27 वर्षीय एका विकृत हैवानाला ताब्यात घेतले आहे. त्याला स्थळ पाहणी साठी घेऊन जाऊन या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्याला न्यायालयाने हजर केले आहे. मात्र याबाबत पीडित चिमुकलेच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद हकीकत बघून काळीज पिळवटल्याशिवाय राहणार नाही. एक तर इतक्या लहान बालिकेवर अत्याचाराची कल्पनाच कोणी करू शकत नाही. मात्र या हैवानाला ही विकृती सुचली. त्याने रेल्वे स्थानक परिसरात खेळणाऱ्या या चिमुकलीवरच झडप घातली आणि डाव साधला. तिला फूस लावून या ठिकाणाहून उचलून आडबाजूला नेले. रेल्वे स्थानक परिसरातील एका कंपाऊंडच्या बाजूला नेत तिच्यावर अमानुषपणे हैवानी कृत्य केल्याचे या फिर्यादीतून आता स्पष्ट झाले आहे. लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार इतका निचपणाचा व किळसवानी आहे की, यामध्ये या हैवानाने या चिमुकलेला आडबाजूला नेऊन अगोदर तिच्या गुप्तांगात काटक्या घालून  अत्याचार केले, त्यानंतर लैंगिक अत्याचार केले आणि पुन्हा तिला स्थानकाच्या परिसरात रक्तबंबाळ अवस्थेत आणून सोडून देऊन पळून गेला. ही हकीकत ऐकून कोणत्याही सह्रदयी माणसाच्या हृदयाला पीळ बसल्याशिवाय राहणार नाही. अतिशय संतापजनक व चीड आणणारी ही घटना असुन अशा हैवानी वृत्ती वेळीच ठेचल्या गेल्या पाहिजे अशी भावनाता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

पोलीसांची तत्पर कारवाई....

  दिनांक 31/08/2025 रोजी पंढरपूर येथुन एक कुटुंब मुलाबाळांसह परळी येथे आले होते.  दुपारी 15:00 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरच जेवण करून सदरचे कुटुंब झोपी गेले होते. दरम्यान रेल्वे स्टेशन परळी येथे एक आरोपी नराधम याने पिडीत बालक वय वर्ष 06 हीस रेल्वे स्टेशन वरील उड्डानपुलाकडे घेवुन जाऊन तिचेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. लैंगिक अत्याचार करुन आरोपी फरार झाला होता.या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वरीष्ठांना माहिती दिली. त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. सहाय्यक पोलीस अधीक्षक, पोलीस स्टेशन संभाजीनगर, स्था.गु.शा. यांनी अथक परिश्रम करून घटना घडल्यानंतर सर्व तांत्रीक बाबी तपासून 05 तासांच्या आत आरोपी निष्पन्न करुन आरोपीस तात्काळ अटक केली आहे.

चिमुकलीवरील 'हैवानी' अत्याचार: प्रकरण फास्टट्रॅकवर चालवा,आरोपी हैवानाला फाशी द्या - मागणीसाठी तीन तारखेला परळी बंदचे आवाहन....


      बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या पवित्र परळी वैजनाथाच्या भूमीत बाहेर गावाहून आलेल्या मजूर कुटुंबातील एका पाच वर्षीय चिमुकलीवर हैवानी गैरकृत्य करणाऱ्या आरोपी हैवानाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा, तातडीने या हैवानी वृत्तीचा बिमोड करा या मागणीसाठी तमाम परळीकरांच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

         परळी रेल्वे स्थानकात दि. 31 रोजी पंढरपूर येथून रेल्वेने आलेल्या व रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका मजूर कुटुंबातील चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाने सर्व स्तरात प्रचंड चीड व संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारचे हैवानी कृत्य करण्याची वृत्ती परळीत निपजत असेल तर याचा वेळीच बिमोड केला गेला पाहिजे. यासाठी तमाम परळीकरांनी एकत्रित येत या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय केला आहे. या हैवानी कृत्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असुन हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवावी व या हैवानाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जनआंदोलन करण्याबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते दि. 3 सप्टेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद पाळून तमाम परळीकर या नीच व हैवानी घटनेचा व अशा हैवानी वृत्तीचा निषेध व्यक्त करणार आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रमुख दोन मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देणार आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध व आरोपीला फाशी देऊन समाजात अशा हैवानी वृत्तींना सज्जड संदेश देण्यासाठी परळी बंद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तमाम परळीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आरपीएफच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह 

   दरम्यान, या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने परळी रेल्वे आरपीएफ कर्मचाऱ्यांनी पीडित मुलीच्या आईला हीन वागणूक दिल्याचा आरोप केला जात आहे. घटना घडल्यानंतर या ठिकाणी एका आरपीएफ जवानाकडे गेले असता तिला न्याय व तिची दाद ऐकून घेण्यात ऐवजी या जवानाने तिलाच शिवीगाळ करत स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान एवढ्या गंभीर व संवेदनशील विषयातही आरपीएफ कर्मचारी नागरिकांशी अशा पद्धतीने वागणार असतील तर त्यांनाही दोषी धरुन या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!