मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

नगरपरिषद प्रशासकांनी "सर्वधर्म समत्रास" देण्याचे काम चालू केले - अश्विन मोगरकर

रखडवलेले काम: गणेशपार चौकातील खोदलेली नाली; नागरिकांना त्रास!



अन्यथा नगरपरिषदेसमोरच नाला खोदून प्रवेशबंदी आंदोलनाचा इशारा

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     गणेशपार चौकातील खोदलेल्या नालीचे काम मागील तीन महिन्यापासून न झाल्याने गणेश मंदिर व सदर बाजार मशीद जवळ नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने नगरपरिषद प्रशासकांनी "सर्वधर्म समत्रास" देण्याचे काम चालू केले आहे, लवकरात लवकर या नालीचे काम पूर्ण करून प्रश्न सोडवला नाही तर नगरपरिषद इमारती समोर नाली खोदून आत कोणालाही जाऊ न देण्याचे आंदोलन करण्याचा इशारा भाजपा परळी शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

गावभागातील गणेशपार येथील चौकातील नाली मागील तीन महिन्यापासून खोदून ठेवण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण पावसाळ्यात येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ऐन चौकात खड्डा असल्याने वारंवार गाड्या अडकणे, पडणे, छोटे मोठे अपघात येथे झाले आहेत. याच चौकात गणेश मंदिर, मागे सदर बाजार इमारत, जवळच राम मंदिर, जैन मंदिर कडे जाणाऱ्या भाविकांना कायम या घाण पाण्यातून जावे लागत असल्याने रोष निर्माण होत आहे. नुकताच श्रावण महिना, गणपती उत्सव, महालक्ष्मी सण, ईद, पर्युषण पर्व असे विविध धर्माचे सण उत्सव झाले. या उत्सव काळात खोदलेल्या नाली मुळे वारंवार गणेशपार भागात नालीचे पाणी साचत असल्याची तक्रार करूनही परळी नगरपरिषदेच्या प्रशासकाने दुर्लक्षच केल्याने नगरपरिषदेने "सर्वधर्म समत्रास" देण्याचे धोरणच अवलंबल्याचा आरोप अश्विन मोगरकर यांनी केला आहे.

आता लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे, गणेशपार चौकात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असते, संपूर्ण परळी शहरातील देवीभक्त याच चौकातून काळरात्री मंदिराकडे जात असतात. किमान नवरात्र सुरू होण्यापूर्वी तरी या नालीचे काम पूर्ण करावे व देविभक्तांचा रोष टाळावा.

जून महिन्यात म्हणजे तीन महिन्यांपूर्वी स्वतः परळी वैजनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी गणेशपार येथील भर चौकातील खोदलेली नाली पाहून गेले व दोन दिवसात नाली बांधून देण्याचे आश्वासन देऊन गेले. मात्र अजूनही तीन महिन्यांनंतर सुद्धा फक्त 10-12 फुटाची नाली बांधकाम परळी नगरपरिषद करू शकले नाही. हजारों कोटींचा निधी शहरासाठी येऊनही कामे करण्याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचा फटका मात्र नगरिकांना बसत आहे.

यापूर्वीही अनेक वेळा सांगून झाले आहे. आता लवकरात लवकर या नालीचे काम पूर्ण करून प्रश्न सोडवला नाही तर नगरपरिषद इमारती समोर नाली खोदून आत कोणालाही जाऊ न देण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी प्रशासनास दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....