आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबाची घेणार भेट!

मंत्री छगन भुजबळ आज वांगदरी (ता. रेणापूर) येथे घेणार आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबाची भेट!



      लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली.या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ओबीसी नेते ना.छगन भुजबळ हे आज दि.१२ रोजी वांगदरी (ता. रेणापूर) येथे येणार आहेत.याबाबत छगन भुजबळ यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

अशी आहे ना.छगन भुजबळ यांची पोस्ट:-

लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली!


या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी लातूर येथे या आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जात आहे.


सध्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडी सर्वसामान्य ओबीसीला अस्वस्थ करणाऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण संविधान आणि कायद्यामुळे नक्की न्याय मिळेल,त्यासाठी लढावं लागणार आहे. त्याला आपण खंबीर आहोत. त्यामुळे कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांना माझे कळकळीचे आवाहन आहे." - छगन भुजबळ 



#OBC 

#Latur


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !