इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

अभिष्टचिंतन विशेष लेख......

 शैक्षणिक,सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे प्रदीप खाडे





            बीड जिल्ह्यातील ज्या काही युवकांनी आपला अल्पावधीतच त्यांच्या कार्यामुळे जनमाणसात ठसा उमटविला आहे.अशा युवकांपैकी एक नाव म्हणजे प्रदीप खाडे.प्रदीप खाडे हे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत तर कै.रामभाऊ अण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.यासह विविध सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

        शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्याचे महान कार्य करणारे राष्ट्रपिता महात्मा फुले म्हणतात 'शिक्षण हे सर्वांगिण विकासाचे प्रवेशद्वार आहे ' तर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,' शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.' म्हणजे शिक्षणात किती ताकद आहे हे या महानवांनी बहुजन समाजाला सांगितले आहे.शिक्षणाचे हे क्रांतिकारी शस्त्र लक्षात घेऊन राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी  सुध्दा समाजसुधारणे करिता शिक्षण संस्था सुरू केल्या. आणि रानावनात भटकणारा, डोंगर द- यात  शेती करणारा समाज भगवान बाबांनी विकासाच्या प्रवाहात आणला.

    महामानवांचे विचार आत्मसात करून प्रथम प्रदीप खाडे हे स्वतः उच्चशिक्षित झाले.पदवीधर झाले.आणि आपला समाज सुधरायचा असेल तर समाज शिकला पाहिजे, ग्रामीण भागात शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागतो.पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते आपल्या मुलांना शहरात लाखो रुपये खर्च करून शिक्षणासाठी पाठवू शकत नाहीत.गरीबीमुळे तर अनेक मुलांना अर्ध्यावर शाळा सोडावी लागते.व आई वडिलांना हातभार लावण्यासाठी कामाला जावे लागते.मजूरीला जावे लागते.

  आपल्या भागातील हे भीषण वास्तव ओळखून प्रदीप खाडे यांनी गडचिरोली येथे नोकरीसाठी ऑर्डर आलेली असतांनाही शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचे ठरविले.वडील बीड जिल्हा बॅंकेत कार्यरत असल्याने व घरातील इतर मंडळींचा गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करण्यास विरोध असल्याने रुजु होवुनही प्रदिपराव यांनी नोकरी सोडली. कै.रामभाऊआण्णा खाडे व साहेबराव बाजीराव डापकर (दुकानदार) हे दोन्हीकडील आजोबा पंचक्रोशीत प्रतिष्ठीत म्हणुन ओळखले जातात.अशा या कुटुंबाच्या सानिध्यात शिक्षण घेत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी जवळुन अनुभवलेल्या प्रदिप खाडे यांना ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली

     याच दरम्यान रावसाहेब चाटे,बाप्पा शिंदे सारखे शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीमत्वाच्या सानिध्यात आल्यानंतर एकटे पुढे जाण्यापेक्षा ग्रामीण भागातील सर्वसामान्य पुढे नेऊ या उद्देशाने कै.रामभाऊ (आण्णा) खाडे सेवाभावी संस्था लातुर या संस्थेची स्थापना केली.संस्थेचे सचिव व्यंकटेश पापा मुंडे व उपाध्यक्ष बालाजी फड यांच्या भक्कम सहकार्याने 2008- 09 साली अध्यापक विद्यालयाचा दिंद्रुड ता.माजलगाव येथे पहिला वर्ग सुरु केला.मागील 13 वर्षात या अध्यापक विद्यालयातुन 1200 विद्यार्थी पास झाले असुन यात 36 जण शिक्षक,एक पीएसआय,एक नायब तहसिलदार पदावर रुजु झाले आहेत.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जिल्हा प्राचार्य सुभाष कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली 2008-09 साली ज्युनिअर कॉलेज मंजुर केल्यानंतर हिंगणी बु.ता.धारुर येथे यश जुनिअर कॉलेज सुरु केले.यश कनिष्ठ महाविद्यालय,नंदनज ता. परळी वैजनाथ.यश इंटरनॅशनल (CBSC ) स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज,दिंद्रुड ता.माजलगाव.यश डी.एल.एम.टी. & नर्सिंग कॉलेज दिंद्रुड ता. माजलगाव.यश बी.एस्सी. बायोइन्फोरमॅटिक्स कॉलेज,लातूर पडीले कॉम्पलॅक्स,लातूर जि. लातूर.रमन ज्यू. कॉलेज (कला, विज्ञान, वाणिज्य) पूस ता. अंबाजोगाई.यश प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संगम ता. धारुर.स्मारक माध्यमिक विद्यालय, श्रीरामपूर जि.अहमदनगर अशा संस्थांचे जाळे निर्माण करत बीड,लातुर व अहमदनगर या जिल्ह्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होत आहे.

    अथक परिश्रमांतून गुणवत्ता सिध्द केलेले दिंद्रुड येथील अध्यापक विद्यालय सीसीटिव्हीच्या निगराणीत परिक्षा घेणारे महाराष्ट्रातील एकमेव अध्यापक विद्यालय ठरले .केवळ बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शिक्षण क्षेत्रात प्रचंड प्रगती व स्पर्धा असलेल्या लातुर येथे एकमेव यश बी.एस्सी.बायोइन्फोरमॅटिक्स कॉलेजमुळे लातुरच्या शिक्षणक्षेत्रातील गुणवत्तेत भर टाकली आहे.परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यवाढीसाठी दीर्घकालीन न्यालयीन लढा देत कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह 300 जणांची सदस्यवाढ करण्याबरोबरच या शिक्षण संस्थेच्या निवडणुका लागु होण्यापासुन होईपर्यंत असलेल्या महत्वपुर्ण योगदानामुळे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब याबाबत हे सर्व प्रदिप खाडे याच्यामुळे शक्य झाल्याचे गौरवोद्गार काढले होते.

   प्रदीप खाडे यांना शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुध्दा मोठी आवड आहे.माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून परळी तालुक्यात जे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्या कार्यक्रमात ते स्वतःला झोकून देतात.व धनंजय मुंडे साहेब जी जबाबदारी देतात ती यशस्वीपणे पार पाडत असतात.त्यांचा मित्र परिवारही फार मोठा आहे.सतत लोकांत राहणं आणि लोकांची कामे करणे याला ते प्राधान्य देतात.

    परळी येथे 2023 मध्ये पार पडलेल्या मराठवाडा पातळीवरील शिक्षक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वी सेवा बजावली होती.त्यामुळे केवळ शैक्षणीकच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातही कार्य करणाऱ्या प्रदीप खाडे यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

     ✍️ रानबा गायकवाड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!