परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी मतदारसंघासह संपूर्ण बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार - धनंजय मुंडे
परळी वैद्यनाथ तालुक्यातील अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडे यांनी केली पाहणी
अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात, नदीतील दगड गोट्यांचे पंचनामे कसे करणार?
स्थानिक आपत्ती मदत, सुरळीत वीज पुरवठा यांसह विविध कामे प्राधान्याने करण्याच्या स्थानिक प्रशासनास सूचना
परळी वैद्यनाथ (दि. १६) - परळी वैद्यनाथ मतदारसंघासह बीड जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी व पावसाने मोठे नुकसान केले आहे. ५०% पेक्षा अधिक खरीप पिके पाण्याने नासून गेली आहेत. बहुतांश भागात शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे, तर अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतात दगड गोट्यांचे खच साचले आहेत, अनेक गावांमध्येही पुराचे पाणी शिरून नुकसान झाले असून, घरांची पडझड, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, धान्याचे नुकसान, पशू धनाची हानी, ग्रामीण भागातील रस्ते - पुल तुटणे किंवा वाहून जाणे, संरक्षक भिंती खचने असे अनेक प्रकारचे नुकसान झाले असून, परळी सह संपूर्ण बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून, त्या निकषानुसार मदत जाहीर करावी, अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परळी तालुक्यात झालेल्या नुकसानीची आज धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुक्यातील वाण टाकळी, बोधेगाव, मोहा, कावळे वाडी, वंजारवाडी, गर्देवाडी इत्यादी गावांना भेटी देऊन शेती पिकांच्या तसेच अन्य नुकसानीची पाहणी केली. वाण टाकळी गावात नदीचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले असून, स्थानिक आपत्ती निवारण निधीतून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असल्यास त्या ठिकाणी तातडीची मदत करण्याच्या सूचना धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
काही ठिकाणी पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतात दगड गोटे तसेच रस्त्याचे डांबर वाहून आले आहे, अशा परिस्थितीत नेमका कसा पंचनामा करणार, असा प्रश्न मुंडेंनी उपस्थित केला.
दरम्यान नुकसान झालेले रस्ते, पुल इत्यादींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने दखल करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दरम्यान या भागातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ऊस यांसह पिकांचे मोठे नुकसान झाले असून, खरिपात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे श्री मुंडे म्हणले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, बालाजी (पिंटू) मुंडे, विष्णुपंत सोळंके, विष्णुपंत देशमुख, मोहन सोळंके, प्रदीप (बबलू) मुंडे, माऊली तात्या गडदे, माऊली मुंडे, भानुदास डीघोळे, ज्ञानोबा सलगर, अंगद मुंडे, राजाभाऊ हांगे, तुकाराम मुंडे, अभिमन्यु गडदे, अशोकराव दिघोळे, फुलचंद चाटे, बलभीम शेरकर, नमाजी गडदे त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांसह तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, महावितरणचे अभियंता यांसह मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा