दुर्दैवी घटना....
मस्साजोग येथे विजेचा शॉक लागून कंत्राटी ऑपरेटरचा मृत्यू
केज :- केज तालुक्यातही मस्साजोग येथे एका कंत्राटी वीज ऑपरेटरचा शेतातील डीपीला विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केज येथील अमोल तुळशीराम लव्हारे वय (२८ वर्ष) हे मस्साजोग येथील ११ के.व्ही. वीज उपकेंद्रात कंत्राटी तत्वावर ऑपरेटर म्हणून काम करीत होते. दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८:०० वा. च्या सुमारास अमोल लव्हारे यास शेतातील डीपीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती गावात मिळाली. त्या नंतर गावकऱ्यांनी वीज वितरणाचे अधिकारी आणि पोलिसांना याची माहिती दिली. अमोल लव्हारे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा