आज शेवटचा दिवस..... लाभ घ्या

महिलांचा स्वयंरोजगार उपक्रम: गृहलक्ष्मी ग्रुपच्यावतिने आयोजित शॉपिंग स्टॉल्स महोत्सवाला भरभरून प्रतिसाद



विठ्ठल मंदिर जाजूवाडी  येथे लागले एकत्रित गृहोपयोगी साहित्याचे स्टॉल्स

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
      महिलांना आवश्यक असलेल्या वस्तुंची एकाच ठिकाणी खरेदी करता यावी, महिलांच्या व्यवसायाची वृध्दी व्हावी यासाठी परळी शहरातील  गृहलक्ष्मी ग्रुपच्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या प्रिती निलेश टाक यांच्या पुढाकारातून शॉपिंग स्टॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

       परळी शहरातील विठ्ठल मंदिर जाजूवाडी  येथे  येथे दि.१३ व दि.१४ सप्टेंबर हे दोन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशीया महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्टॉलमधुन लागणाऱ्या गृहपयोगी साहित्याची खरेदी करता येणार आहे.यामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू,बाजारपेठेत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, चप्पल,साड्या, ज्वेलरी,कटलरी अशा सर्व वस्तू माफक दरात उपलब्ध आहेत.खरेदीस महिलांसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे. या उपक्रमात परळीतील महिलांनी तसेच बाहेरील प्रसिद्ध ज्वेलरीची स्टॉल्स टाकली आहेत.गृहलक्ष्मी ग्रुपच्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या प्रिती निलेश टाक यांच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षांपासून हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. नेहमीप्रमाणेच या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.खरेदीसाठी आज रविवार दि.१४ सप्टेंबर हा शेवटचा दिवस असुन या खरेदी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मट्टीकुलची भांडी आणि कुशग्रासचे साहित्य ठरतेय लक्षवेधी....
     दरम्यान या महोत्सवात मट्टीकुलची भांडी आणि कुशग्रासचे साहित्याचे स्टॉल आकर्षण ठरले आहे.या स्टॉलमध्ये विविध गृह उपयोगी शुद्ध मातीची मट्टीकुलची विविध भांडी,तसेच कुशग्रास पासून बनवलेले विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे स्टॉल या महोत्सवात लक्षवेधी ठरले आहे. या स्टाॅलला भेट द्या गृह उपयोगी साहित्याची खरेदी करा असे आवाहन या स्टॉलच्या संचालिका श्वेता आशिष काबरा यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !